लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : येथील शेतकरी बबन ढोकणे यांच्या शेतातील विहिरीचे खोदकाम सुरू करण्यात आले. हे काम सुरू असताना मंगळवारी सकाळच्या सुमारास ती अचानक खचली. यावेळी चार मजूर विहिरीत काम होते. ते थोडक्यात बचावले; मात्र यात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून ओलिताची समस्या निर्माण झाली आहे.बबन ढोकणे यांच्याकडे पाच एकर शेत आहे. त्यांची संपुर्ण शेती ओलिताखाली होती. त्यांच्या शेतात २५-३० वर्षांपुर्वी विहीर करण्यात आली होती. परंतु यावर्षी विहिरीची एक बाजू खचली. खचलेली बाजू दुरूस्त करण्याकरिता त्यांनी रसुलाबाद येथून मजूर आणले. सोमवारपासून या विहिरीच्या दुरूस्तीचे काम सुरू झाले. आज सकाळच्या सुमारास चार मजूर विहिरीत काम करीत असताना अचानक आतील भाग खचला. यावेळी रामकृष्ण बोरकर, ओंकार भगत, गणेश बोरकर, नारायण पंधरे सर्वच रा. रसुलाबाद व धनराज राऊत रा. जामणी हे थोडक्यात बचावले. विहीर खचणे सुरू होताच ते बाहेर पडले.विहीर पूर्ण खचल्यामुळे शेतकºयासमोर ओलिताचा प्रश्न उभा झाला. यावर्षी कपाशी बोंड अळीने फस्त केल्यामुळे उत्पन्न घटले. त्यामुळे आर्थिक अडचण असताना उसनवारीतून विहीर दुरूस्तीचे काम सुरू केले. आता ती विहीर जास्तच खचल्यामुळे सदर शेतकरी हताश झाला आहे. संबंधित विभागाने नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.कालव्याचे बांधकाम धोक्यातनिम्न वर्धा कालव्याचे काम याच शिवारात सुरू आहे. या कामाला असणारे मजूर सदर विहिरीच्या बाजुला झोपड्या करून राहत आहे. ते याच विहिरीचे पाणी पीत असून बांधकामाकरिता याच विहिरीचे पाणी वापरत होते. यामुळे ओलिताचा नव्हे तर मजुरांच्या पिण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर झाला आहे. यामुळे सदर शेतकºयाला मदत करण्याची मागणी होत आहे.
खोदकामादरम्यान विहीर खचली; चार मजूर बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 11:40 PM
येथील शेतकरी बबन ढोकणे यांच्या शेतातील विहिरीचे खोदकाम सुरू करण्यात आले. हे काम सुरू असताना मंगळवारी सकाळच्या सुमारास ती अचानक खचली. यावेळी चार मजूर विहिरीत काम होते.
ठळक मुद्देशेतकऱ्याचे आर्थिक नुकसान : ओलिताची समस्या उद्भवली