लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : पश्चिम महाराष्ट्र धार्जीण्या सरकारने १९६४ मध्ये विदर्भाचे १२०० कोटी पळविले नव्हे तर चोरले. विदर्भातील शेतकऱ्यांची दयनिय अवस्था आहे. व ही अवस्था बदलवायची असेल तर तेलंगाणासारखा बदल विदर्भांमध्ये होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विदर्भ राज्य पार्टीचे संस्थापक अॅड. श्रीहरी अणे यांनी केले.वडनेर येथे विदर्भ राज्य जनजागृती अभियानाअंतर्गत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्रीहरी अणे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून विदर्भ राज्य आघाडीचे कार्याध्यक्ष निरज खांदेवाले उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ राज्य आघाडीचे उपाध्यक्ष अनिल जवादे, सुरेंद्र पारधी, शैलेंद्र हारोंडे, सुरेश खत्री, भारत पाटील, राजेंद्र पाटील, गोकुल पाटील उपस्थित होते.अनिल जवादे यांनी विदर्भातील शेतकऱ्यांची प्राचीन काळापासून कशी लूट होत आहे. हे अत्यंत प्रभावीपणे समजावून सांगितले पूर्वी शेतकऱ्यांना मोगलांनी, इंग्रजांनी लुटले आज मात्र राजकीय व्यवस्था स्वातंत्र्यानंतरही शेतकºयांना सतत लुटत आहे. ही लूट जर थांबवायची असेल तर विदर्भ राज्य निर्माण होणे गरजेचे आहे,असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. महेश माकडे यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिक उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्राने विदर्भाला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:34 AM
पश्चिम महाराष्ट्र धार्जीण्या सरकारने १९६४ मध्ये विदर्भाचे १२०० कोटी पळविले नव्हे तर चोरले. विदर्भातील शेतकऱ्यांची दयनिय अवस्था आहे. व ही अवस्था बदलवायची असेल तर तेलंगाणासारखा बदल विदर्भांमध्ये होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विदर्भ राज्य पार्टीचे संस्थापक अॅड. श्रीहरी अणे यांनी केले.
ठळक मुद्देश्रीहरी अणे यांचे प्रतिपादन : वडनेर येथे जाहीर सभा