लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेल्या मोहता मिलच्या कामगारांना मागील काही दिवसांपासून व्यवस्थापनाकडून सहकार्य केले जात नव्हते.वीस वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याच्या उद्देशाने मोहता ग्रुपने विविध षडयंत्र रचले. याच्या विरोधात कामगारांनी आवाजही उठविला पण, शुक्रवारी सायंकाळी मिल व्यवस्थापनाने जल व वायु प्रदुषणाचे कारण पुढे करुन मिलमधील विद्युत व पाणीपुरवठा खंडीत करुन मिलचे कामकाज बंद केले आहे. त्यामुळे आयुष्याच्या उमेदीचा काळ मिलमध्ये घालविणाऱ्या साडेसहाशे कर्मचाऱ्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.हिंगणघाट येथील मोहता ग्रुपने १२५ वर्षाच्या कार्यकाळात या मिलमध्ये व्हिविंग अॅण्ड स्पिनिंग, प्रोसेसिंग युनिट सुरू आहे. मेलमध्ये ३ शिफ्ट कामगार काम करतात. या मिलमध्ये १२०० ते १३०० कामगार २०१५ पर्यंत काम करीत होते. तसेच ठेकेदारी मध्ये जवळपास २०० कामगार काम करीत होते. या कामगारांच्या भरोशावर मोठी प्रगती साधली. या ग्रुपने हिगणघाट व वणी येथे गिमाटेक्स, जांब येथे पी.व्ही.टेक्सटाईल व बुरकोनी येथे आर.एस.आर.मोहता मिल्स, अशा मोठ्या कंपन्या उभारल्या. या सर्व कंपन्या अद्यावत असून चांगल्या प्रकारे सुरुही आहे. मात्र, मोहता मिलमध्ये वीस वर्षांपासून काम करणाºया कामगारांना व्यवस्थापनाने कायम केले नाही. ०१ मार्च २०१७ पासून मोहता मिलच्या व्यवस्थापनाने कपडा खाता बंद केला. त्यामुळे कामगारांसमोरील अडचणींचा फास आवळल्या गेला. मागील सहा महिन्यांपासून प्रोसस व फोल्डींग विभागातील कामगारांना जाणीवपूर्वक काम देणे बंद केले. तसेच अन्य खात्यात सुद्धा काप्लीमेंटनुसार कामही दिले नाही. तसेच दोन महिन्यांपासून कामगारांचे वेतन सुद्धा वेळेवर दिले नाही. कामगारांना ले-ऑफ देण्यात येते परंतु कामगारांना ले-आॅफचा पगार देण्यात येत नाही. तसेच बदली कामगारांना रिटर्न देण्यात येते मात्र ते रिटर्नचा मोबदला देत नाही, अशा अनेक समस्या या व्यवस्थापनाने कामगारांपुढे उभ्या करुन त्यांचे खच्चिकरण सुरु केले. याच्या विरोधात कामगारांनी कामगार संघटनेच्या माध्यमातून मागण्या शासन दरबारी मांडल्या परंतु त्यांना यश आले नाही. अखेर शनिवारी जल व वायु प्रदुषणाच्या नावाने मिलचा विद्युत व पाणीपुरवठा खंडीत केला. याची माहिती पहिल्या पाळीतील कामगारांना मिळाल्यावर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे मिलमधील साडेसहाशे कामगारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे.कामगारांची जनसंवाद कार्यक्रमात धडकपहिल्या पाळीतील कामगार नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी मिलमध्ये गेले असता मिलच्या मुख्यव्दाराच्या बाजुला असलेल्या सूचना फलकावर मिलव्दारे जल व वायुप्रदुषण वाढत असल्याने या मिलचा विद्युत आणि पाणीपुरवठा खंडीत करण्यात आल्याची माहिली लावलेली होती. यावरुन या मिल व्यवस्थापनाने कामबंद केल्याचे कामगारांच्या लक्षात येताच सर्व कामगार एकत्र आले. दरम्यान, वर्धेच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनसंवाद कार्यक्रम असल्याची माहिती मिळाल्याने सर्व कामगारांनी जनसंवाद कार्यक्रमात धडक दिली. यावेळी मिल व्यवस्थापकाकडून कामगारांच्या होणाऱ्या शोषणाबाबत माहिती देऊन कामगारांच्या संमस्या सोडविण्याची मागणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.
मोहता मिलची चाके थांबली साडेसहाशे कामगार वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 6:00 AM
वीस वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याच्या उद्देशाने मोहता ग्रुपने विविध षडयंत्र रचले. याच्या विरोधात कामगारांनी आवाजही उठविला पण, शुक्रवारी सायंकाळी मिल व्यवस्थापनाने जल व वायु प्रदुषणाचे कारण पुढे करुन मिलमधील विद्युत व पाणीपुरवठा खंडीत करुन मिलचे कामकाज बंद केले आहे.
ठळक मुद्देविद्युत व पाणीपुरवठा खंडीत । कामगारांनी पालकमंत्र्यांकडे मांडल्या व्यथा