लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या तसेच जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या वर्धा जिल्ह्यात सध्या अवैध दारूविक्री व गुन्हेगारीला खतपाणी मिळत आहे. त्यामुळे सण तसेच उत्सवांमध्ये जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र, संबंधितांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, अवैध धंद्यांसह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध पोलीस प्रशासन धाडसत्र राबविणार तरी केव्हा, असा प्रश्न सध्या नागरिकांकडून विचारला जात आहे. विशेष म्हणजे अनेक दारू विक्रेत्यांसह तस्कर व बडे गुन्हेगार सध्या मोकाट आहेत.प्राप्त माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यात एकूण १९ पोलीस स्टेशन आहेत. शिवाय गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची विशेष चमूही आहे. परंतु, सध्या जिल्ह्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात गावठी दारू गाळून त्याची विक्री होताना दिसून येते. शिवाय देशी व प्रत्येक ब्रॅण्डची विदेशी दारू वर्धा शहरातील चौकाचौकात तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांत खुलेआम विक्री होताना दिसते. जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुक्ल विभाग व पोलीस प्रशासनाच्या खांद्यावर आहे. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभाग नेहमीच अल्प मनुष्यबळ असल्याचे रडगान गाते.तर पोलीस प्रशासनावर दारू पकडण्याचा अतिरिक्त बोजा असल्याचे अधिकारी सांगतात. असे असले तरी या दोन्ही विभागाकडून दारूविके्रत्यांवर वेळोवेळी कारवाई केली जाते; पण सध्या दारूविक्रीच्या व्यवसायाला ऊत आल्याचेच दिसून येत आहे. वर्धा शहरातील अनेक ठिकाणी सध्या खुलेआम दारूविक्री होत आहे. शिवाय हीच परिस्थिती ग्रामीण भागातही पहावयास मिळते. त्यामुळे या दोन्ही विभागांनी एकत्र येत विशेष मोहीम राबवून दारूविक्रेत्यांवर धाडसत्र सुरू करण्याची मागणी आहे. तर हत्या, प्राणघातक हल्ला, हत्यार बाळगणारे व छुप्या पद्धतीने खंडणी वसूल करणे, तसेच टोळीने गुन्हा करणे प्रकरणी गुन्हे दाखल असलेले गुन्हेगारी प्रवृत्तीचे अनेक व्यक्ती सध्या मोकाट आहेत.यात वर्धा शहरातील इतवारा, पुलफैल, आर्वी नाका परिसर आणि वर्धा शहराशेजारील म्हसाळा, सावंगी (मेघे) आदी भागातील रहिवासी असलेल्या आरोपींचा समावेश आहे. त्याचे खुरापती धंदे सध्या सर्वसामान्यांच्या अडचणीत भर टाकत असल्याने पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेण्याची मागणी आहे.प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव धूळखातयंदा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेक व्यक्तींविरुद्ध पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली असली तरी पाच प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत.सध्या गुन्हेगारी आणि दारूविक्रीच्या व्यवसायाला खतपाणी मिळत असल्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळत आहे. कुख्यात गुन्हेगारांविरुद्ध तसेच अट्टल दारूविक्रेत्यांविरुद्ध पोलिसांनी विशेष धाडसत्र राबवून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. शिवाय अट्टल गुन्हेगार व दारूव्रिकेत्यांवर तडीपारीची कारवाई करावी.- निहाल पांडे, संस्थापक अध्यक्ष, युवा परिवर्तन की आवाज, वर्धापोलीस अनेकदा चोर सोडून सन्यासी व्यक्तीला ताब्यात घेऊन खाकीचा रुबाब दाखवतात. त्यापेक्षा या खाकी वर्दीवाल्यांनी खºया गुन्हेगारांना सण व उत्सवांदरम्यान ताब्यात घेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. पोलिसांच्या या विशेष कामगिरीमुळे परिसरात शांतता नांदेल.- सुनील वाघ,सरपंच, ग्रा.पं. रोहणा.हत्या, प्राणघातक हल्ला आदी गंभीर गुन्ह्यांत वाढ होण्यासाठी दोन मुख्य कारणे असतात. पहिला रोष तर दुसरा व्यसनाधीनता. बंदी असताना सध्या हिंगणघाट तालुक्यासह जिल्ह्यात देशी, विदेशी व गावठी दारू आणि गांजा सहज मिळत आहे. त्यामुळे युवा पिढी व्यसनाच्या जाळ्यात अडकत आहे. एका उपविभागीय पोलीस अधिकाºयाने त्यांच्या कार्यकाळात हिंगणघाट तालुक्यात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी केल्याने गुन्हेगारीलाही आळा बसला होता. गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलिसांकडे अनेक पर्याय असतात. कायदा सुव्यवस्था कायम राहण्यासह जिल्ह्यात शांतता नांदण्यासाठी त्यांनी त्याचा योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे.- अॅड. इब्राहिम बख्श आजाद, सामाजिक कार्यकर्ता, हिंगणघाट.देशाबाहेरील शत्रूंशी सीमेवर असलेला सैनिक स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दोन-दोन हात करतो. परंतु, देशातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिसांवर असते. ते त्यांचे कर्तव्य बजावतातच. सण व उत्सवांदरम्यान जिल्ह्यात शांतता कायम राहण्यासाठी अवैध व्यवसाय करणाºयांवर आणि गुन्हेगारी प्रवृतीच्या व्यक्तींवर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे.- राजेश सावरकर, माजी सैनिक तथा सरपंच, रसुलाबाद.
अवैध धंद्यांसह गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांचे धाडसत्र केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 6:00 AM
वर्धा शहरातील अनेक ठिकाणी सध्या खुलेआम दारूविक्री होत आहे. शिवाय हीच परिस्थिती ग्रामीण भागातही पहावयास मिळते. त्यामुळे या दोन्ही विभागांनी एकत्र येत विशेष मोहीम राबवून दारूविक्रेत्यांवर धाडसत्र सुरू करण्याची मागणी आहे.
ठळक मुद्देबडे गुन्हेगार मोकाट : उत्सवात शांतता भंग होण्याची शक्यता