लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : दीड हजार लोकसंख्या असलेल्या चंदेवाणी गावातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी कंबरभर पाण्यातून नदी ओलांडून जीवघेणा प्रवास करीत जावे लागते. या समस्येबाबत गत दोन वर्षांपासून शासन व लोकप्रतिनिधी कडे गावकºयांनी लेखी तक्रार केली पण कुंभकर्णी झोपेत असलेल्या शासनाला अद्याप जाग आली नाही. दिवाळीपूर्वी या नदीवर पूल बांधल्या गेला नाही. आणि पांदन रस्त्याचे रूंदीकरण व खडीकरण व डांबरीकरण केले नाही. तर आंदोलन करण्याचा इशारा गावकºयांनी दिला आहे. चंदवाणी हे कांरजा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाचे गाव आहे. गावाला लागून एक मोठी नदी आहे. १०० हून अधिक शेतकºयांची शेती नदीपलीकडे सेलगाव शिवारात आहे. ती शेती करण्यासाठी, महिला पुरूष व युवकांना कंबरभर पाण्यातून जीव धोक्यात टाकून जावे लागतात. यापूर्वी नदी ओलांडून जाताना, अपघात झाले आहे. नदीच्या पात्रात दोन्ही बाजूला सिमेंट बंधारे बांधले. असल्यामुळे पावसाळ्यात भरपूर पाणी असते. शेतीची अवजारे सोबत घेवून पोहत जावे लागते. या गावातून विद्यार्थी विद्यार्थिंनी सेलगावच्या माध्यमिक विद्यालयात, शिकायला जातात. पूर असला की, शिक्षण बंद, शाळेला जाता येत नाही.तसेच या गावातून सेलगावकडे जाण्यासाठी पांदन रस्ता आहे. पण या पांदन रस्त्यावर गावातील काही सधन शेतकºयांनी अतिक्रमण करून ४० फुटाची पांदन फक्त १० फुटाची राहिली आहे. या पांदन रस्त्याने बैलबंडी तर सोडा पण पायी सुद्धा सुरक्षित पणे जाता येत नाही. या पांदन रस्त्याच्या अतिक्रमण हटवून खडीकरण, डांबरीकरण व रूंदीकरण करावे अशी नागरिकांची मागणी आहे.नदीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पूल बांधकाम करण्यात यावे तसेच पांदन रस्त्याचे खडीकरण, रूंदीकरण व डांबरीकरण करावे यासाठी ग्रामपंचायत व गावकºयांनी शासनाकडे मागील वर्षी क्रांतीदिनी तक्रार केली. परंतु त्यावर शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे आता संतप्त गावकºयांनी दिवाळीपर्यंतची मुदत शासनाला दिली असून नदीवर, पांदन रस्त्याचे काम मार्गी न लावल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.अनेक गावांची अशीच व्यथाकारंजा तालुक्यातील चंदेवाणी गावातील नागरिक नाल्यातून पोहून मार्ग काढतात. अशीच परिस्थिती पवनार-वाहितपूर गावादरम्यान आहे. येथेही नागरिकांना होडीच्या सहाय्याने मार्ग काढावा लागतो. अनेकदा दुर्घटना घडतात. तेव्हा प्रशासन जागे होते. मात्र या नागरिकांच्या समस्येकडे दुुर्लक्ष कायम केले जात आहे. या गावांना पुल रस्ते देण्यात अपयश आले आहे.
चंदेवाणी नदीवरील पूल केव्हा होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:45 AM
दीड हजार लोकसंख्या असलेल्या चंदेवाणी गावातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी कंबरभर पाण्यातून नदी ओलांडून जीवघेणा प्रवास करीत जावे लागते. या समस्येबाबत गत दोन वर्षांपासून शासन व लोकप्रतिनिधी कडे गावकºयांनी लेखी तक्रार केली पण कुंभकर्णी झोपेत असलेल्या शासनाला अद्याप जाग आली नाही.
ठळक मुद्देअपघाताचा धोका : शेती औजारे घेऊन शेतकरी पोहून जातात