शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

कर्जमाफी आंदोलनात कॉँग्रेस होती कुठे?

By admin | Published: June 17, 2017 12:41 AM

राज्यासह वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी संप पाळून आपल्या भावना व्यक्त केल्या.

राज्यासह वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी संप पाळून आपल्या भावना व्यक्त केल्या. शेतकऱ्यांच्या या आंदोलनात राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉँग्रेस पक्षाला सहभागी होवून शेतकऱ्यांच्या बाजुने उभे राहण्याची नामी संधी उपलब्ध झाली होती; पण कोमात असलेल्या कॉँग्रेस पक्षाच्या वर्धा जिल्ह्यातील पुढाऱ्यांना शेतकऱ्यांच्या सोबत उभे राहणेही जमले नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याभरात शेतकऱ्यांचे जे आंदोलन झाले, ते आंदोलन त्यांनी स्वबळावरच उभे केलेले आंदोलन होते. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची दखल घेवून कर्जमाफी करण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यामुळे या संपूर्ण कर्जमाफीचे श्रेय शेतकऱ्यांनाच जाते. वर्धा जिल्हा हा महात्मा गांधींची कर्मभूमी आहे. ऐकेकाळी हा संपूर्ण जिल्हा कॉँग्रेस पक्षाच्या अधिपत्याखाली होता. विरोधी पक्ष येथे नावालाही नव्हता. केवळ रामचंद्रकाका घंगारे यांचा कम्युनिस्ट पक्ष कॉँग्रेसला तोंड देण्याचे काम करीत होता. कॉँग्रेसच्या विरोधात काका हेच एकमेव परंपरागत उमेदवार राहत होते. येथील कॉँग्रेसची धुरा बराच काळ १९८० च्या दशकात माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे, त्यानंतर प्रभाताई राव यांनी वाहिली. साठेंच्या राजकारणाची धुरा प्रमोद शेंडे यांच्याकडे होती व या तीन धुरीणींच्या माध्यमातून जिल्ह्याचे राजकारण चालविले जात होते. त्यानंतर काही काळ दत्ता मेघेही कॉँग्रेसचे नेतृत्वकर्ते झाले व या जिल्ह्यात गावागावात कॉँग्रेस रूजल्या गेली; मात्र आता कॉँग्रेस नेतृत्वहिन झाल्याचे दिसून येत आहे. कॉँग्रेसचा कार्यकर्ता गावागावात असला तरी त्याला मार्गदर्शन करणारा नेता राहिलेला नाही. सत्ता हातून गेल्यामुळे नेते मंडळी शेतकऱ्यांसोबत उभे राहण्यासाठीही बाहेर येऊ शकले नाही. उन्ह, वाऱ्याची पर्वा न करता शेतकऱ्यांनी आपले आंदोलन लढविले व गड सर केला. कॉँग्रेसचे नेते म्हणून माजी मंत्री आमदार रणजीत कांबळे, आ. अमर काळे व वर्धा मतदार संघातून पराभूत झालेले उमेदवार शेखर शेंडे यांच्याकडे पाहिले जाते; मात्र या तीनही नेत्यांचा शेतकरी आंदोलनात कुठेही सहभाग असल्याचे दिसून आले नाही. महाराष्ट्र महिला प्रदेश कॉँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकसही कुठे दिसल्या नाही. राष्ट्रवादीचेही अनेक बडे नेते शेतकरी आंदोलनापासून दूर राहिले. हिंगणघाटात केवळ अ‍ॅड. सुधीर कोठारी व माजी आमदार राजू तिमांडे यांनी एक दिवस शेतकऱ्यांसाठी दिला. बाकी नेत्यांचा कुठेही पत्ता नव्हता. कॉँग्रेस पक्षाचे काम जिल्ह्यात सत्ता गेल्यानंतर दिसायला हवे होते. विरोधी पक्षाच्या बाकावर राहूनही शेतकऱ्यांची लढाई जिल्ह्यात कॉँग्रेस लढली असती तर कॉँग्रेसबद्दल निश्चितच आदर वाढला असता; पण नेत्यांनाच आता मतदार, शेतकरी, जनता, कामगार यांच्या प्रश्नात लक्ष घालण्याची गरज वाटत नाही. केवळ एसीत बसून पक्ष चालणार नाही. गावागावात पोहोचावे लागणार आहे. १५ वर्षे सत्तेत राहिलेल्या कॉँग्रेस नेत्यांची मानसिकता अजूनही लोकांसाठी लढण्याची तयार झालेली नाही. मरगळलेल्या कॉँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी जनआंदोलनच आवश्यक आहे; मात्र या आंदोलनाचे नेतृत्व करण्यात कॉँग्रेसचे नेते कमी पडत आहे. शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक बुडीत खात्यात जमा झाली आहे. शासनाच्या कर्जमाफीनंतरही ही बॅँक पुन्हा उभी होण्याचे चिन्ह नाही. कॉँग्रेसने बॅँक बुडविणाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्याची गरज होती; पण कॉँग्रेसचे नेते बॅँक बुडविणाऱ्या लोकांसोबतच स्थानिक निवडणुकांमध्ये आघाड्या व युत्या करून त्यांच्या कृत्याचे समर्थन करताना दिसून येत आहे. अशावेळी त्या बॅँकेत ज्या शेतकरी, कर्मचारी, कामगार यांचा पैसा पडून आहे, त्यांनी न्यायासाठी जायचे कुणाकडे, हा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे अशा लोकांना विरोधी पक्ष बाकावर असूनही कॉँग्रेसकडून काहीच आशा उरली नाही. ही परिस्थिती कायम राहिल्यास कॉँग्रेसमुक्त जिल्हा होण्यास वेळ लागणार नाही. तसाही नगर पालिकेत कॉँग्रेसमुक्त जिल्हा झालेलाच आहे. आता विधानसभेची वाट तेवढी बाकी आहे. आगामी दोन वर्षांत जिल्ह्यातील कॉँग्रेस नेतृत्वाने काही बोध घेतला नाही, तर विधानसभेतही कॉँग्रेसमुक्त जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही.