शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

पेयजल योजनेची विहीर ठरतेय पांढरा हत्ती

By admin | Published: May 01, 2017 12:39 AM

येथे कृत्रिम पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. या गावात अगोदरच दोन नळयोजनेच्या विहिरी,

नागरिकांना करावी लागते भटकंती : महिलांनी गाजवली ग्रामसभा तळेगाव(टा.) : येथे कृत्रिम पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. या गावात अगोदरच दोन नळयोजनेच्या विहिरी, दोन जलकुंभ सार्वजनिक विहिरी, खाजगी विहिरी, कुपनलीका आले. तरीही नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात ग्रा.पं. असमर्थ ठरत आहे. पेयजल योजनेच्या विहिरीलाही पाणी राहत नसल्याने ती पांढरा हत्ती ठरत आहे. पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत असल्याने ग्रा.पं.ची ग्रामसभा महिलांनी चांगलीच गाजवली. तीन वर्षापूर्वी ग्रामपंचायतने १.६६ लाखाची राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना शासनस्तरावर पाठपुरावा करून मंजुर करून घेतली. दोन वर्षे ही योजना श्रेय लाटण्यावरून वादात रखडली. यावर्षी या योजनेचे जंलकुंभ, सात कि.मी. पाईलाईन, विद्युत पुरवठा करण्यात आला. या योजनेचे जलकुंभात पाणीही पोहचले. पण, विहिरीचे अजुनही खोलीकरण पूर्ण व्हायचे असल्याने एक ते दीड तासातच विहीर कोरडी पडते. त्यामुळे ग्रामपंचायत पाणी देण्यास असमर्थ ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून गावकऱ्यांना मुबलक पाणी मिळेल अशी आशा होती. पण, विहिरीतही पाणी नाही. त्यामुळे ग्रा.पं. प्रशासनही हतबल असल्याचे दिसते. सदर योजनेचे सर्व कामे झाली असले तरी विहिरीचे खोलीकरण अपूर्ण असल्याने जलकुंभ भरत नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांना घागर घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायत सभागृहात ग्रामसभा पार पडली. यात महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवित सभागृहात पाणी समस्येवर चर्चा केली. सभेमध्ये सरपंच, ग्रा.पं. सदस्य, सचिव उपस्थित होते. महिलांनी केलेल्या पाणी समस्याबाबत प्रश्नाला उत्तरे सरपंच यांनी दिले. त्यांनी पाणी समस्याबाबत माहिती दिली. पण, यावेळी महिला व काही पुरुषांनी सभागृहातच ग्रा.पं. सदस्य व सचिवांना चांगलेच धारेवर धरले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सोमवार १ मे रोजी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली असून ही ग्रामसभा पाण्याच्या प्रश्नावर चांगलीच गाजणार असल्याचे चित्र आहे. गावाला १४ व्हॉल मधून पाणी पुरवठा केल्या जात असून दहा बारा दिवसाआड नागरिकांना पाणी पुरवठा केल्या जातो. एकूणच योजनेची कामे रखडल्याने ग्रा.पं. प्रशासनाची स्थिती ना घर का ना घाटका अशी झाली आहे.(वार्ताहर)