शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

कोण पास, कोण फेल, ४ जूनला निकाल

By रवींद्र चांदेकर | Published: May 04, 2024 4:08 PM

सर्वांचीच धडधड वाढली : विधानसभेचा गड सर करण्याची चिंता

वर्धा : लोकसभेसाठी २६ एप्रिलला मतदान पार पडले. त्याला आठ दिवस लोटले. निवडणुकीत खासदारांसह आमदारांचीही परीक्षा पार पडली. या परीक्षेत नेमके कोण पास झाले अन् कोण फेल झाले, याचा ४ जूनला मतमोजणीअंती निकाल लागणार आहे.

वर्धा लोकसभा मतदारसंघात तब्बल ६४.८५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तत्पूर्वी १६ दिवस प्रचार तोफा धडधडत होत्या. गावोगावी प्रचाराचा धुराळा उडला होता. जागोजागी निवडणुकीची चर्चा सुरू होती. मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी उमेदवार आणि त्यांचे समर्थक जिवाचे रान करीत होते. लोकसभा मतदारसंघातील आमदारही आपापल्या उमेदवारासाठी घाम गाळत होते. निवडणूक खासदारकीची, मात्र परीक्षा आमदारांची होती. त्यामुळे सर्व आमदार आपापल्या विधानसभा मतदारसंघात परिश्रम घेत होते. अगदी २५ एप्रिलच्या रात्रीपर्यंतपर्यंत त्यांनी जोमाने काम केले. त्यानंतर २६ एप्रिलला प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही आमदारांनी मतदार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

निवडणुकीची तारीख आणि उमेदवारी घोषित झाल्यापासून जवळपास २३ ते २५ दिवस निवडणुकीची धामधूम सुरू होती. अहोरात्र उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी कामात मग्न होते. आपला उमेदवार कसा विजयी होईल, याची रणनीती आखण्यात ते व्यस्त होते. यानंतर प्रत्यक्ष मतदानाचा दिवस उजाडला. २६ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. मतदारांनी आपल्या मनातील उमेदवाराच्या नाव व चिन्हासमोरील बटण दाबून आपले ‘दानाचे कर्तव्य’ निभावले. मतदार आपले कर्तव्य निभावून निश्चिंत झाले असले तरी आता उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची चुळबुळ सुरू झाली आहे.खासदारकीच्या या निवडणुकीत सहा आमदारांनी परीक्षा दिला. त्यापैकी किती आमदार परीक्षेत पास अन् फेल झाले, याचा उलगडा ४ जूनला मतमोजणीअंती होणार आहे. कोणत्या आमदाराच्या विधानसभा मतदारसंघात ‘त्यांचा’ उमेदवार सरस ठरतो, यावरून त्यांची परीक्षा होणार आहे. त्यांच्या मतदारसंघात उमेदवार आघाडीवर किंवा मागे राहिल्यास, त्याचे फळ त्यांना मिळू शकते. त्यावरूनच त्यांची पुढील विधानसभेची उमेदवारी ठरण्याची शक्यता आहे. त्यांचा उमेदवार माघारल्यास त्यांच्याऐवजी मतदारसंघातील ‘नव्या’ इच्छुकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.

पाच विरुद्ध एक आमदारनिवडणुकीत महायुतीच्या बाजूने पाच, तर महाविकास आघाडीच्या बाजूने एक विधानसभा आमदार होते. यापैकी गेल्यावेळी महायुतीच्या उमेदवाराला मोर्शी विधानसभा मतदारसंघात ४८ हजार, हिंगणघाटमध्ये ३८ हजार, वर्धेत ३७ हजार, आर्वीत २६ हजार, धामणगावमध्ये १८ हजार, तर देवळी विधानसभा मतदारसंघातून १६ हजारांच्या वर आघाडी होती. महाविकास आघाडीच्या उमेदवार सर्वच विधानसभा मतदारसंघात मागे होत्या. या निवडणुकीत ही आघाडी कमी झाल्यास महायुतीसोबत असणाऱ्या आमदारांची चांगलीच गोची होणार आहे. विशेषत: दोन टर्मपासून आमदार असणाऱ्यांना पुन्हा उमेदवारी मिळविणे दुरापास्त होण्याची शक्यता आहे. अशावेळी विधानसभा निवडणुकीदरम्यान काही जण ऐनवेळी ‘दलबदल’ करण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने असलेल्या आमदारांच्या विधानसभेत त्यांच्या उमेदवाराला आघाडी न मिळाल्यास त्यांनाही पुढे उमेदवारी मिळविणे जड जाण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी त्यांनी अत्यंत ताकदीने काम केल्याचे सांगितले जात आहे.

मतदारांच्या मौनाने वाढवली चिंता

मतदार आपले कर्तव्य निभावून मौन झाले आहेत. त्यांनी आपले पत्ते अद्याप उघड केले नाही. मात्र, त्यांच्या भरवशावर विविध पक्षांचे कार्यकर्ते, गावपुढारीच अंदाज बांधत सुटले आहेत. मतदारांनी आपल्याच उमेदवाराला मत दिल्याचा कार्यकर्त्यांना विश्वास आहे. त्या आधारावरच त्यांचे गणित सुरू आहे. त्यातून विजयाची गुढी उभारण्यासाठी ते आतुर झाले आहेत. मात्र, मतदार मौन असल्याने त्यांची चिंता वाढली आहे. खरे चित्र ४ जूनलाच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४VotingमतदानElectionनिवडणूक