शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
4
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
5
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
7
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
8
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
10
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
11
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
12
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
15
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
16
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
18
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
19
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

वर्ध्यांचा पक्षी ठरणार ‘भारतीय निलपंख’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 10:57 PM

वर्ध्यात विदर्भातून पहिल्यांदाच पक्ष्यांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. दीड महिना चाललेल्या या मतदान प्रक्रियेत जवळपास ५८ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या अनोख्या निवडणुकीत पाच पक्षी उमेदवार रिंगणात होते.

ठळक मुद्देदीड महिन्यात ५८ हजार मतदारांनी बजावला अधिकार : निकालाकडे लक्ष

आनंद इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्ध्यात विदर्भातून पहिल्यांदाच पक्ष्यांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. दीड महिना चाललेल्या या मतदान प्रक्रियेत जवळपास ५८ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या अनोख्या निवडणुकीत पाच पक्षी उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी ‘भारतीय निलपंख’ या पक्षाचेच पारडे जड असल्याचे बोलले जात आहे.शहरातील वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. पर्यावरणाचे रक्षणकर्ते असलेल्या पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी बहार नेचर फाऊंडेशन व वर्धा न.प.च्यावतीने वर्धा शहरपक्ष्यांची निवडणूक घेतली आहे. या निवडणुकीत वर्धा शहराच्या आसपास वावरणाऱ्या तांबट, धीवर (पांढºया छातीचा), ठिपकेबाज पिंगळा, भारतीय निलपंख व कापशी घार या पाच पक्ष्यांना निवडणूक रिंंंगणात उतरविले. या उमेदवार पक्ष्यांना जास्तीत जास्त मतदान मिळावे म्हणून जोरदार प्रचार करण्यात आला. हा उपक्रम केवळ मतदानापुरता मर्यादित न ठेवता, या काळात विविध माध्यमांद्वारे परिसरातील पक्ष्यांबाबत जनजागृती करीत छायाचित्र प्रदर्शनी, चित्रफितीद्वारे सादरीकरण, मगन संग्रहालयाच्या भिंतीवर पाखरांची शाळा, माझा पक्षी माझे चित्र स्पर्धा, सायकल प्रचारयात्रा, उमेदवार एका मंचावर असे अनेक उपक्रम राबविले. त्याला वर्धेकरांनी भरभरुन दाद दिली. जवळपास ५८ हजार मतदारांनी मतदान केले. आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे असून या निवडणुकीत भारतीय निलपंख व धीवर यांच्यात होणार असली तरी बहुमत निलपंख पक्षाला मिळण्याची शक्यता आहे.तीन हजार मतदारांनी केले आॅनलाईन मतदानवर्धा शहरपक्षी निवडणुकीत उमेदवार असलेल्या पाचही पक्ष्यांना मतदान करण्यासाठी आॅनलाईन आणि मतपत्रिकेव्दारे मतदान घेण्यात आले. २३ जूनपासून सुरु झालेल्या मतदान प्रक्रि येची १५ आॅगस्टला महामतदानाने सांगता झाली. या दीड महिन्याच्या कालावधीत तीन हजार मतदारांनी आॅनलाईन मतदान केले. तर जवळपास ५५ हजार मतदारांनी मतपत्रिकेव्दारे मतदान केले आहे.बुधवारी निकालशहरपक्षी निवडणुकीचा निकाल बुधवार २२ आॅगस्टला जाहीर होणार आहे. स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयात सकाळी ७ वाजतापासून या आगळ्यावेगळ्या निवडणुकीच्या मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. यावेळी निवडणूक निरीक्षक अतुल शर्मा, डॉ. गोपाल पालीवाल व डॉ. तारक काटे यांच्या उपस्थितीत पाच फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया होणाार असून लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पर्यावरणवादी कार्यकर्ते भेट देणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी चितारलेल्या पक्षीचित्रांची प्रदर्शनीही सभागृहात लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.सहा कि.मी.चा परिसर मतदान क्षेत्रशहरालगतचा सहा किलो मीटरपर्यंतचा परिसर हा मतदान क्षेत्र होते. या मतदानात सावंगी, भूगांव, सेवाग्राम, येळाकेळी, पवनार येथील विविध शाळा, महाविद्यालय व पक्षीमित्रांनी मतदान केले. ही प्रक्रि या यशस्वीपणे राबविण्यासाठी उमेदवारांच्या अनेक प्रतिनिधींनी अविरत परिश्रम घेतले आहे.पक्षीतज्ज्ञ चितमपल्ली करणार शहरपक्षाची घोषणामतमोजणी पूर्ण होताच प्रख्यात पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली वर्धा शहरपक्ष्याची अधिकृत घोषणा करणार आहेत. निकालाची प्रत नगराध्यक्ष अतुल तराळे व मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्याकडे सोपविली जाईल. या निवडणुकीतील विजेत्या शहरपक्ष्याचा पुतळा वर्धानगरीतील मुख्य चौकात स्थापन करण्यात येणार आहे.