तारा तुटल्यास वीजप्रवाह खंडित होण्याची भीती, वर्धा : पावसामुळे शहरात ठिकठिकाणी झुडपी वेली वाढल्या आहेत. विजेच्या खांबावरून तारांवर या वेली लोंबक ळत आहे. दिवसेंदिवस या वेली वाढत असल्याने वजन वाढून ताराही लोंबकळत आहे. यामुळे तारा तुटून अपघाताचा धोका वाढला आहे. हाच प्रकार सध्या जेल रोड परिसरात पाहावयास मिळत आहे. महावितरणने याकडे लक्ष देत वेलींना तोडून तारांना स्वच्छ करणे गरजेचे झाले आहे. पावसाला सुरुवात होताच वेली, गवत उगवायला सुरुवात होते. पावसाळ्यात त्या अधिक बहरतात. वेलवर्गीय झाडे वाढताना वर जाण्यासाठी धडपड करीत असतो. त्यामुळे आसपासच्या झाडांचा अथवा वीजखांबांचा आधार घेत या वेली वर चढत जातात. वीजखांबांचा आधार घेत वर गेलेल्या वेली आडव्या तारांवर वाढत जातात. त्यामुळे आडव्या तारांवर वेलींचे बनच तयार होते. शिवाजी चौकाकडून जेल कडे जात असलेल्या मार्गावर वीजतारांवर वेलींचा असाच विळखा पडला आहे. त्यामुळे वीजतारांना लोंबकळत आहे. वेली वाढत आहे तससश्या ताराही दिवसेंदिवस लोंबकळत आहे. असेच सुरू राहिल्यास काहीच दिवसात झाडांपासून तार तुटून पडण्याची शक्यता आहे. या तारांमध्ये वीजप्रवाह सुरू असल्याने तारा तुटल्यास धोका होऊ शकतो. त्यातच सध्या पाऊस सुरू आहे. या वेली पावसाचेही पाणी धरून ठेवत असल्याने तारांवररील वेलींचे वजन आणखी वाढते. अश्यावेळी ंतारा तुटून रस्त्यावर पसरल्यास वीजतारांचा स्पर्श होऊन जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. या मार्गावर अनेक शाळा असल्याने येथे विद्यार्थी सतत ये जा करीत असतात. अशा स्थितीत त्यांच्याही जीवितास धोका उत्पन्न होत आहे. पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी हा प्रकार दिसून येतो. तरेही महावितरण याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करतात. अपघात झाल्यावरच वीज वितरणला जाग येईल का असा प्रश्नही या परिसरात राहणारे नागरिक व्यक्त करतात. यावर कार्यवाही गरजेची आहे.(शहर प्रतिनिधी) वीजखांबही झुकले वेलींचा वीजतारांवर विळखा पडल्याने तारा तर लोंबकळत आहेच पण विजेचे खांबही झुकत चालले आहे. असेच चित्र राहिल्यास खांब आणखी झुकता केव्हा पडेल याचा नेम नाही. या वेली तोंडून तारांवरील भार कमी कराणे गरजेचे आहे. हा प्रकार शहरात सर्वत्र दिसतो. शेतशिवारांमध्येही हे चित्र आहे. पण कुणाचेही याकडे लक्ष नसल्याने धोका वाढला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शहराचा एकदा तरी फेरफटका मारल्यास त्यांना ही बाब निदर्शनास येईल. महावितरणने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी आहे.
वेलींमुळे तारा लोंबकळल्या
By admin | Published: July 23, 2016 2:41 AM