लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येळाकेळी येथे उभ्या असलेल्या डंपरची बॅटरी चोरीला गेली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपीला गजाआड केले. वसंता रामाजी पवार (४५) व मयूर अरविंद चापडे (२४) दोघेही रा. येळाकेळी अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.येळाकेळी येथील जितेंद्र श्यामराव घोंगडे यांनी आपल्या मालकीचा डंपर क्रमांक एमएच ४९ ०५२२ घराशेजारी उभा करून ठेवला होता. या डंपरची दहा हजार रुपये किमतीची बॅटरी अज्ञार चोरट्याने लंपास केली. या प्रकरणी सावंगी पोलिसांत तक्रारीनंतर ठाणेदार रेवचंद सिंगणजुडे यांच्या सूचनेप्रमाणे डी. बी. पथकातील चमूने वेगाने तपासकार्य आरंभिले आणि अवघ्या २४ तासांतच आरोपींना अटक करण्यात यश आले. आरोपी वसंता पवार व मयूर चापडे या दोघांकडून चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी टेळे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सिंगणजुडे, डी. बी. पथकाचे रामदास बिसने, प्रदीप राऊत, अमोल भिवापुरे, सूरज जाधव आदींनी केली.
२४ तासांतच बॅटरीचोर गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:58 AM
येळाकेळी येथे उभ्या असलेल्या डंपरची बॅटरी चोरीला गेली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपीला गजाआड केले. वसंता रामाजी पवार (४५) व मयूर अरविंद चापडे (२४) दोघेही रा. येळाकेळी अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
ठळक मुद्देसावंगी पोलिसांची कारवाई : मुद्देमाल जप्त