शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

संघर्षाशिवाय कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार नाही

By admin | Published: July 15, 2015 2:36 AM

या देशातील सुजाण नागरिक घडविण्याचे काम अंगणवाडी कर्मचारी करतात. तर आरोग्य व्यवस्थेमध्ये आशा सेविकांचा सिंहाचा वाटा आहे.

आयटकचे अधिवेशन : मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिकावर्धा : या देशातील सुजाण नागरिक घडविण्याचे काम अंगणवाडी कर्मचारी करतात. तर आरोग्य व्यवस्थेमध्ये आशा सेविकांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांना योग्य मोबदला दिलाच पाहिजे. यासाठी संघटना मजबूत करा. कारण संघर्षाशिवाय न्याय मिळणार नाही. असे आवाहन जि. प.च्या महिला व बांधकल्याण सभापती चेतना मानमोडे यांनी केले. आयटक संलग्नित अंगणवाडी युनियन व आरोग्य खाते आणि आशा व गटप्रवर्तक संघटनेचे (आयटक) जिल्हा अधिवेशन सोमवारी शहिद काँ. गोविंद पानसरे व्यासपीठ दादाजी धुनिवाले मठ येथे घेण्यात आले. यावेळी उद्घाटनपर भाषणात त्या बोलत होत्या. मनोहर पचारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या राज्य सरचिटणीस अ‍ॅड. माधुरी क्षीरसागर संघटनेचे राज्य अध्यक्ष सुकुमार दामले, राज्य सहसचिव उषा चारभे, राज्य उपाध्यक्ष बी. के. जाधव, गुणवंत डकरे आणि गजेंद्र सुरकार उपस्थित होते. भारत सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केलेली पेंशन योजना रुजू झालेल्या तारखेपासून सेवा गृहीत धरून लागू करण्याच्या मुख्य मागणीसह संघटनेच्या इतरही मागण्यांसाठी २० जुलै रोजी वर्धा येथे विशाल मोर्चा काढण्यासंदर्भात तसेच २ सप्टेंबर २०१५ रोजी देशव्यापी संपाविषयी ठराव करण्यात आला. यावेळी संघटनेची तीन वर्षाकरिता जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली. यात अध्यक्षपदी विजया पावडे, कार्याध्यक्ष मंगला इंगोले, उपाध्यक्ष शोभा तिवारी, विमल कौरती, सुनंदा आखाडे, नलिनी चौधरी, सचिव वंदना कोळणकर, सहसचिव ज्ञानेश्वरी डंभारे, माला भगत, पार्बता जुनघरे, संघटन सचिव रेखा काचोळे, निर्मला सातपुते, इरफाना पठाण, वंदना बाचले, कोषाध्यक्ष मैना उईके, संघटक असलम पठाण, सहसंघटक यमुना नगराळे तर सदस्या आशा गळहाट, रेखा पाटील, हिरा बावणे, विजय कौरती, शोभा सायंकार, गिता पालेवाल, सुनिता भगत, सुरेखा रोहणकर, संगीता काळे, रंजना तांबेकर, सुनिता टिपले, विमल करपाचे, बबीता चिमोटे, निर्मला नेहारे, सुनिता बोरकर, मिना ढोके, संगीता ठाकरे, माला कुत्तरमारे, बेबी ठाकरे, रेखा भगत यांची निवड करण्यात आली. संचालन शुभांगी बांगडे तर आभार अरुणा नागोसे यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)