लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/हिंगणघाट : जिल्ह्यात अत्याचाराच्या घटनांचे सत्र सुरुच असल्याचे दिसून येत आहे. हिंगणघाट शहरात मामानेच अल्पवयीन भाच्यावर तर सेलू तालुक्यातील बोरधरण येथे लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार करण्यात आला. एकाच दिवशी अत्याचाराच्या दोन घटना उघडकीस आल्याने जिल्हा हादरुन गेला आहे.हिंगणघाट येथे नवव्या वर्गात शिक्षण घेणारा १४ वर्षीय मुलगा प्रकृती ठिक नसल्याने घरीच होता. त्याचे आई-वडील शेतीकामाला गेले होते. यादरम्यान त्याचा मामा घरी आला व त्याने एका खोलीत नेत त्यांच्यावर अत्याचार केला. घाबरलेल्या मुलाने घडलेला प्रकार घराशेजारी राहणाऱ्यास सांगितला. त्यांनी लगेच त्याच्या आई-वडिलांना फोन लावून सर्व आपबिती कथन केली. लगेच आई-वडिलांनी घर गाठत हिंगणघाट पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीस अटक केली आहे. तर बोरधरण येथील घटनेत माहूर येथील महिलेशी राहूल बोदे रा. सिंदी(रेल्वे) यांची मोबाईलवरुन तीन वर्षांपूर्वी मैत्री झाली. दोघांमध्ये भेटीगाठी सुरु झाल्याने त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध प्रस्तापित झाले. पीडिता पहिल्या पतीपासून असलेल्या दोन मुलांसह वणी येथे किरायाने राहतात. राहुल याने तिला लग्नाचे आमिष दाखवून बोरधरण येथील एका हॉटेलमध्ये बोलावित होता. याच हॉटेलमध्ये त्याने ७ डिसेंबर, १४ डिसेंबर व ७ फेब्रुवारी रोजी बोलावून अत्याचार केला. त्यानंतर महिलेने लग्नास गळ घातली असता राहूल बोदे यांनी टाळाटाळ सुरु केली. काही दिवसानंतर पीडितेने राहुलला फोन केला असता त्याने माझे लग्न झाले आता फोन करु नको, असे सांगितले. त्यामुळे पीडितेने राहुलचे घर गाठले असता त्याच्या घरच्यांनी तिला मारहाण करीत घराबाहेर काढले. त्यामुळे महिलेने सेलू पोलिसात तक्रारी असून पोलिसांनी राहुल बोदे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तलाठ्याकडून मुलीचा विनयभंगकारंजा (घा.): तालुक्यातील धावसा येथे कार्यरत असलेल्या तलाठ्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना गुरुवारी तक्रारीअंती उघडकीस आली. याप्रकरणी कारंजा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तलाठ्याला अटक केली आहे.सुखदेव गोविंद सावरकर (५०) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याने घरी कुणीही नसल्याची संधी पाहून १७ वर्षीय युवतीचा विनयभंग केला. युवतीने आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी चांगलाच चोप देत त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून तलाठ्याला अटक केली आहे.
हिंगणघाटात भाच्यावर, बोरधरण येथे महिलेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 5:00 AM
हिंगणघाट येथे नवव्या वर्गात शिक्षण घेणारा १४ वर्षीय मुलगा प्रकृती ठिक नसल्याने घरीच होता. त्याचे आई-वडील शेतीकामाला गेले होते. यादरम्यान त्याचा मामा घरी आला व त्याने एका खोलीत नेत त्यांच्यावर अत्याचार केला. घाबरलेल्या मुलाने घडलेला प्रकार घराशेजारी राहणाऱ्यास सांगितला. त्यांनी लगेच त्याच्या आई-वडिलांना फोन लावून सर्व आपबिती कथन केली. लगेच आई-वडिलांनी घर गाठत हिंगणघाट पोलिसांत तक्रार दिली.
ठळक मुद्देएकाच दिवशी दोन घटना : अत्याचाराचे सत्र थांबता थांबेना