लोकमत न्यूज नेटवर्कसमुुद्रपूर : वयोवृद्ध महिलेचे प्रतिज्ञापत्र करून देतो म्हणून १ हजार २३० रुपये घेतले. तरी काम करून न दिले नाही. यामुळे या महिलेने पैसे घेणाºया दलालास चांगलेच बदडले. हा प्रकार येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडला.तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये दलालांचा व्यवसाय चांगलाच फोफावत आहे. त्यांच्या मार्फत आल्याशिवाय कामे होत नाही. यावर ओरड झाल्याने तहसीलदार दीपक करंडे यांनी कामाकरिता कोणत्याही दलाला पैसे देऊ नका असा संदेश दिला होता. शिवाय दलालांनाही ताकीद दिली होती.असे असतानाही काही दलालांकडून प्रकार सुरूच होता. कमलाकर कांबळे नामक व्यक्तीने मुरातपूर येथील सिताबाई शेळके यांच्याकडून प्रतिज्ञापत्र तयार करून देण्याकरिता १ हजार २३० रुपये घेतले व फक्त एक स्टॅम्प लिहून दिला. कालांतराने महिलेला जाणीव झाली की, आपली फसवणूक झाली. ती परत त्याच्याकडे गेली व पैसे परत मागत होती. तेव्हा तो द्यायला तयार नसल्याने म्हातारीने रणचंडीकेचे रूप धारण करीत त्याला बदडणे सुरू केले. तेथे उपस्थित काही युवक पुढे आले व त्यांनी सुद्धा या दलालास चोप दिला. त्याला घेवून नायब तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्याकडे नेले असता त्यांनी पोलिसांना पाचारण करीत त्या दलालास पोलिसांचे स्वाधीन केले. पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहे.
महिलेने दलालास बदडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:18 AM
वयोवृद्ध महिलेचे प्रतिज्ञापत्र करून देतो म्हणून १ हजार २३० रुपये घेतले. तरी काम करून न दिले नाही. यामुळे या महिलेने पैसे घेणाºया दलालास चांगलेच बदडले. हा प्रकार येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडला.
ठळक मुद्देतहसील कार्यालय परिसरातील घटना