शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

वर्ध्यात बँकेच्या ट्रेनिंगसाठी आलेल्या महिलेला हॉटेलमध्ये डांबून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 5:16 PM

Wardha News, molestation एका महिला बँक कर्मचाऱ्यावर हॉटेलच्या खोलीत डांबून बळजबरीने रात्रभर शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देशहर ठाण्यात गुन्हा दाखलखोलीत डांबून रात्रभर केले शोषण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील हिंगणघाट जळीत प्रकरण ताजे असतानाच आता एका महिला बँक कर्मचाऱ्यावर हॉटेलच्या खोलीत डांबून बळजबरीने रात्रभर शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन उस्मानाबाद येथील एका युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीस जेरबंद करण्याचे मोठे आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे.

पोलीस सुत्रांनुसार, लातूर जिल्ह्यातील खंडपार तालुक्यातील २१ वर्षीय पीडितेने बीसीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एनआयटी कॅम्पसमध्ये मुलाखत दिली. यात तिची निवड झाल्यानंतर ४५ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर पीडितेची वर्धा येथील एका बँकेत बँकर कस्टमर आॅफिसर म्हणून नियुक्ती झाली. १३ मार्च २०२० पासून ती वर्धा येथील रामनगर परिसरातील मुलींच्या वस्तीगृहात राहत होती. काही दिवसानंतर पीडितेची आरोपी कुणाल अनिल पवार रा. उस्मानाबाद याच्याशी ओळख झाली. आरोपी कुणाल हा पीडितेला वारंवार फोन करुन त्रास देत होता.

ही बाब पीडितेने तिच्या आईला सांगितली. पीडितेच्या आईने आरोपी कुणालला समजावून सांगितले. तरी देखील कुणाल हा रात्रीअपरात्री फोन करुन पीडितेला त्रास द्यायचा. ११ सप्टेंबर रोजी आरोपीने फोन करुन शहरातील एका हॉटेलमध्ये बोलाविले. पीडिता त्याला भेटण्यास गेली असता आत्महत्या करण्याची धमकी देत बँक सुटल्यावर रात्री हॉटेलमध्ये येण्यास सांगितले. पीडिता घाबरुन हॉटेलमध्ये गेली असता आरोपीने तिला हॉटेलच्या तिसºया माळ्यावरील एका खोलीत नेले. खोलीत डांबून तोंड बांधून रात्रभर तिचे शारीरिक शोषण केले. अखेर याची माहिती पीडितेने आई-वडिलांना दिल्याने आई-वडिलांनी वर्धा गाठत तिला लातूरला घेऊन गेले. याप्रकरणी आरोपी कुणाल पवार विरुद्ध तक्रार दिली असता घटनास्थळ वर्धा असल्याने प्रकरण शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.चार दिवस करत राहिला अत्याचारपीडितेला हॉटेलमध्ये बोलावून एका खोलीत डांबून आरोपी नराधमाने ११ ते १४ सप्टेंबर तब्बल चार दिवस शारीरिक शोषण केले. पीडिता ओरडत होती पण, कुणीही तिच्या मदतीस धावले नाही. १५ सप्टेंबर रोजी सकाळी आरोपी कुणाल याने पीडितेस खोलीत डांबून स्वत: तेथून पसार झाला.

खासगी रुग्णालयात घेतले उपचारपीडितेवर झालेल्या अत्याचाराने तिची प्रकृती बिघडली होती. मात्र, ही बाब कुणाला सांगावी हे कळत नव्हते. त्रास वाढल्याने पीडिता शहरातील एका खासगी महिला रुग्णालयात पीडितेने उपचार घेतले. मात्र, त्रास असहाय्य झाल्याने पीडितेने तिच्या लहान बहिणीस सर्व आपबिती सांगितल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Molestationविनयभंग