लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लाल नाला प्रकल्पाचे पाणी चंद्रपूरला न देता स्थानिकांना पिण्यासाठी द्यावे या मुख्य तथा अन्य मागण्यांसाठी क्रांतीकारी शेतकरी महिला संघटनेने जिल्हा कचेरीवर धडक दिली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत तीन दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.शेतात विहिरी व जलसाठा असलेले शेतकरी इतरांना पैसे घेऊन पाणी विकतात. यामुळे अशा शेतकऱ्यांच्या विहिरी शासनाने अधिग्रहीत करून त्या विहिरीचे खोलीकरण करीत ते पाणी स्थानिक लोकांना पुरवावे. शासकीय, निमशासकीय जागेवर २० ते ६० वर्षांपासून स्वत:चे घरे बांधून राहत असलेल्या नागरिकांना मालकीचे पट्टे देऊन अस्थिरतेचे वातावरण दूर करावे. ज्यांची घरे जमीनदोस्त होण्याच्या स्थितीत आहे, अशांना त्वरित घरकूल द्यावे. दोन वर्षांपूर्वी घरकूल योजनेचा लाभ घेतला, त्यांना पुन्हा घरकुलाचे अनुदान देणे संतापजनक आहे. खºया गरजू व आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोकांना त्याचा लाभ द्यावा. विधवा, निराधार, अपंग व अनाथ महिलांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा. यातही गैरप्रकार टाळून खऱ्या लाभार्थ्यांची निवड करावी तथा गैरप्रकाराची चौकशी करून कार्यवाही करावी. समुद्रपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुंडे यांची चौकशी करून कार्यवाही करावी. आर्थिक दुर्बल, अत्यंत गरीब लोकांचे बीपीएल क्रमांक गहाळ झाले आहे. आर्थिक दृष्ट्या परिपूर्ण असलेल्यांना बीपीएल योजनेचा लाभ दिला जात आहे. याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी तथा गरजूंना लाभ द्यावा आदी मागण्या करण्यात आल्यास आहेत. तीन दिवसांत कार्यवाही न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या अध्यक्ष मंदा ठवरे यांनी दिला. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
लाल नाल्याच्या पाण्यासाठी महिला आग्रही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 9:33 PM
लाल नाला प्रकल्पाचे पाणी चंद्रपूरला न देता स्थानिकांना पिण्यासाठी द्यावे या मुख्य तथा अन्य मागण्यांसाठी क्रांतीकारी शेतकरी महिला संघटनेने जिल्हा कचेरीवर धडक दिली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत तीन दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.
ठळक मुद्देक्रांतीकारी महिला शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना साकडे