लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : उज्वला गॅस योजना मधील सर्व कागदपत्रांची पुर्तता करून सुद्धा माणिकवाडा येथील दारिद्र्य रेषेखालील महिला योजनेच्या लाभापासून वंचित आहे. त्यांना तात्काळ लाभ द्यावा. यासाठी तहसीलदार सीमा गजभिये यांना भाजपा युवा मोर्चा विधानसभा प्रमुख गजानन भोरे यांच्या नेतृत्वात महिलांनी निवेदन दिले आहे.माणिकवाडा गावातील पात्र लाभार्थी यादी तयार झाल्यावर त्यामधील अवघ्या ३२ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यामुळे पात्र लाभार्थी या योजनेपासून दूर आहे. योजनेचा लाभ विनामुल्य स्वरूपात असून या दाखल रोख रकमेची मागणी होत असल्याचा आरोप होत आहे. यासाठी दि. २५ सप्टेंबर २०१७ ला मासिक सभेत ग्रामपंचायतमध्ये ठराव घेण्यात आला. याप्रकरणी तहसीलदारांना निवेदन देवून चौकशीची मागणी केली आहे. निवेदन देताना गजानन भोरे, पुष्पा बारंगे, उमेश्वरी फरकाडे यांच्यासह २१ महिला उपस्थित होत्या.
माणिकवाडा गावातील महिला उज्वला गॅस योजनेपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 12:03 AM
उज्वला गॅस योजना मधील सर्व कागदपत्रांची पुर्तता करून सुद्धा माणिकवाडा येथील दारिद्र्य रेषेखालील महिला योजनेच्या लाभापासून वंचित आहे.
ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : मासिक सभेत ठराव