शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

पिपरीत साकारणार महिला बचत गटाचे भवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 9:17 PM

महिलांच्या सक्षमीकरणाकरिता ग्रामीण व शहरी भागात बचत गटांचे जाळे विणल्या गेले आहे. याच्या माध्यमातून महिलांनी आपल्या विकासवाटाही शोधल्या असून महिला बचत गटासाठी भवन नसल्याने त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पिपरी ग्रामपंचायतच्या परिसरात महिला बचत गट भवनाची निर्मिती होणार असून हे भवन जिल्ह्यातील एकमेव ठरणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील पहिली इमारत : मातोश्री सभागृहात झाला महिला मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महिलांच्या सक्षमीकरणाकरिता ग्रामीण व शहरी भागात बचत गटांचे जाळे विणल्या गेले आहे. याच्या माध्यमातून महिलांनी आपल्या विकासवाटाही शोधल्या असून महिला बचत गटासाठी भवन नसल्याने त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पिपरी ग्रामपंचायतच्या परिसरात महिला बचत गट भवनाची निर्मिती होणार असून हे भवन जिल्ह्यातील एकमेव ठरणार आहे.शहरातील मातोश्री सभागृहात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १९ लाख रुपयांच्या निधीतून साकारण्यात येणाऱ्या बचत गट भवानाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर यांच्यासह जिल्हा परिषदच्या महिला व बालकल्याण समिती सभापती सोनाली कलोडे, शिक्षण सभापती जयश्री गफाट, पिपरीचे सरपंच अजय गौळकर, पंचायत समिती सभापती महानंदा ताकसांडे, पंचायत समिती राजेश राजुरकर, प्रफुल्ल मोरे, शेतक री मूल्य आयोगाचे प्रशांत इंगळे तिगावकर, बाजार समिती सभापती श्याम कार्लेकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य जयंत कावळे, समाजसेवक संजय ठाकरे, सुनील बुरांडे, उमरी (मेघे) चे उपसरपंच सचिन खोसे, माजी पंचायत समिती सदस्य अर्चना वानखेडे, फारूख शेख, रवी शेंडे, अजय वरटकर, बचतगटाच्या स्वाती वानखेडे आदी उपस्थित होते.यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने खासदार तडस व आमदार डॉ. भोयर यांचा सत्कार करण्यात आला. आज बचत गटाची मोठी चळवळ तयार झाली आहे. आता महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून नवीन संकल्पना अंमलात आणून आपले उत्पन्न वाढवून प्रगती साधावी, असे आवाहन खासदार तडस यांनी केले. बचतगटाच्या रुपात नवीक्रांती होत आहे. बचत गटांनी रोजगाराची निर्मिती करीत स्वयंरोजगाराची कास धरली.पण, या बचत गटासाठी हक्काचे भवन नसल्याने त्यांना अनेक अडचणी येतात. त्याची फलश्रुती म्हणून पिपरीत भवन साकारल्या जात असल्याचे आमदार डॉ. भोयर यांनी सांगितले. संचालन रंजना लामसे यांनी तर आभार वैशाली गुजरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता ग्रामपंचायत सदस्य गजानन वानखेडे, प्रशांत खंडार, वैभव चाफले, सुधीर वसू, मनीष मसराम, सुरेंद्र झाडे, अंकुश जीवने, राहुल दोडके, पंकज उजवणे, डॉ. विद्या राजेंद्र कळसाईत, भारती गाडेकर, कुमुद लाजूरकर, नलिनी परचाके, ज्योती वाघाडे, शुभांगी पोहाणे, महिला बचत गटाच्या अंजली कळमकर, वाघमारे, कांबळे, गुजरकर, पाटील, भारती अण्णावडे, वैशाली गोडे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महिलांची मोठी उपस्थिती होती.