लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : मुलीला मासिक पाळी आल्यानंतर मातेने एच.पी.व्ही. व्हॅक्सीन गिफ्ट करावं व तिचं आरोग्य वेळीच सुरक्षित करून स्वत: सुद्धा पॅप टेस्ट करावी. पालकांनी आपल्या मुलामुलींबद्दल अतिशय जागरूक राहणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन नागपूर येथील स्त्रीरोगतज्ज्ञ माधुरी गावंडे यांनी केले.आधार फाउंडेशनच्या महिला समितीच्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून मकरसंक्रांतीनिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.मेळाव्याचे उद्घाटन दामिनी पथक प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक मेघाली गावंडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. लता मोहता, उद्योजक अॅड. शाईन शेख, रूपाली मिटकर, अॅड. कल्पना बोरेकर, रूपाली हिवसे प्रामुख्याने उपस्थित होत्या.मेघाली गावंडे यांनी वाढत्या सायबर गुन्ह्यांबद्दल चिंता व्यक्त करीत महिलांनी आपण सुरक्षित कसे राहू, काळजी कशा पद्धतीने घ्यावी यावर बोलताना तंत्रज्ञानाचा वापर करावा; पण त्याविषयी सखोल ज्ञान प्राप्त करावे. मोबाईलचा वापर विचारपूर्वक व योग्य पद्धतीने केल्यास त्याचे दुष्परिणाम होणार नाही, असे सांगितले.लता मोहता म्हणाल्या, मानवदेह हा परोपकारी आहे. त्यामुळे माणसाने जीवन जगताना दुसऱ्याच्या उपयागात येईल असे जीवन जगावे, अशा संदेश दिला. अॅड. शाहीन शेख महिलांचे अधिकार व कायदेविषयक माहिती देत म्हणाल्या, आधार फाऊंडेशन खºया अथार्ने सर्वधर्मसमभावाची जपवणूक करीत आहे. रूपाली मिटकर यांनी वास्तूविषयी महिलांमध्ये सौदर्यदृष्टी निर्माण केली.कार्यक्रमातून महिलांसंबधी सर्व विषयावर मार्गदर्शन झाल्याने खºया सर्थाने वैचारिक हळदीकुंकू झाले, अशा प्रतिक्रिया महिलांनी दिल्या. यावेळी महिलांनी उखाणे, गीतगायन व नाटिका सादर केल्या. आधुनिक विचारसरणी स्विकारत व पारंपारिक पध्दती जोपासत उपस्थित महिलांना ओटी देण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून माधुरी विहीरकर यांनी आधार फाउंडेशनची भूमिका विशद केली. संचालन शुभांगी वासनिक यांनी केले. आभार ज्योती धार्मिक यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनसाठी माया चाफले, वैशाली लांजेवार, वीरश्री मुडे, अनिता गुंडे, स्वाती वांदिले, नीता गजबे, अनुराधा मोटवानी, सविता येणोरकर, सुमन डांगरे, राजश्री दांडेकर, उषा गावंडे, ज्योती हेमणे, संगीता घंगारे, राणी सोमवंशी, मंजूषा भलमे, रंजना गभणे, किरण निमट, मयुरी देशमुख, रश्मी धायवटकर, पूजा पांढरे, मीरा कार्या, पल्लवी सातपुते, लता आडकिने, प्रीती पोटदुखे, योगिता कोटकर, पुष्पा येळणे यांच्यासह आधार फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी सहकार्य केले.
कर्करोगापासून बचावासाठी स्त्रियांनी जागरूक राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 6:00 AM
मेळाव्याचे उद्घाटन दामिनी पथक प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक मेघाली गावंडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. लता मोहता, उद्योजक अॅड. शाईन शेख, रूपाली मिटकर, अॅड. कल्पना बोरेकर, रूपाली हिवसे प्रामुख्याने उपस्थित होत्या. मेघाली गावंडे यांनी वाढत्या सायबर गुन्ह्यांबद्दल चिंता व्यक्त करीत महिलांनी आपण सुरक्षित कसे राहू, काळजी कशा पद्धतीने घ्यावी यावर बोलताना तंत्रज्ञानाचा वापर करावा; पण त्याविषयी सखोल ज्ञान प्राप्त करावे.
ठळक मुद्देमाधुरी गावंडे : आधार फाऊंडेशन महिला समितीतर्फे मकरसंक्रांतीनिमित्त महिला मेळावा