लोकमत न्यूज नेटवर्कआंजी (मोठी.) : कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या प्रकृतीची काळजी परिवारातील महिला सदस्य घेतात. परंतु, असे करताना त्या स्वत:च्या आरोग्याची काळजी पाहिजे तशी घेत नाहीत. महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहनजि.प.च्या शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट यांनी केले. त्या येथील आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित आरोग्य शिबिरात मार्गदर्शन करताना बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधीर दिवे तर प्रमुख पाहुणे म्हणून बालरोग तज्ज्ञ डॉ. सचिन पावडे, जि.प.चे अध्यक्ष नितीन मडावी, जि.प. उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, कृषी सभापती मुकेश भिसे, सोनाली कलोडे, जि.प. सभापती निता गजाम, माजी खासदार विजय मुडे, सरपंच जगदीश संचेरिया, जि.प. सदस्य खवशी, अविनाश देव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्याेधन चव्हाण, शिक्षणाधिकारी डुरे, डॉ. अजय डवले, डॉ. गेहलोत, पं.स. सभापती महानंदा ताकसांडे, पवार, मिलींद भेंडे, वंदना बावणे, अंकीता होले, स्वाती इसाये, भाजपाचे महामंत्री सुनील गफाट, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजेश बकाने उपस्थित होते. प्रसंगी नितीन मडावी, जयश्री गफाट, विजय मुडे, राजेश बकाने, डॉ. पुरुषोत्तम मडावी, सुधीर दिवे, डॉ. पावन यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सुनील गफाट यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन गणेश पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. बहादुरे यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेकरिता माजी सरपंच दीपक बावनकर, रामचंद्र बालपांडे, सुधीर बावणे, दिनेश उमक, नितीन भावरकर, वसीम पठाण, धोंगळी, संदीप मुडे, कोठे, सुरेश गिरडकर आदींनी सहकार्य केले.
महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 12:22 AM
कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या प्रकृतीची काळजी परिवारातील महिला सदस्य घेतात. परंतु, असे करताना त्या स्वत:च्या आरोग्याची काळजी पाहिजे तशी घेत नाहीत.
ठळक मुद्देगफाट : ६ हजार जणांनी घेतला शिबिराचा लाभ