शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

स्त्रियांनी संविधान वाचावे

By admin | Published: April 11, 2016 2:22 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांना अमर्याद अधिकार दिले आहे.

मनीषा रिठे : संविधान जागृती अभियानात सभाहिंगणघाट : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांना अमर्याद अधिकार दिले आहे. स्त्री हित व कल्याणाच्या तरतुदी यात केल्या आहे. स्त्री स्वावलंबी व्हावी, पुरुषांप्रमाणेच तिलाही समान हक्क मिळावे, म्हणून कायदे केले; पण आजही बहुसंख्य स्त्रियांना याची माहिती नसल्याचे दिसते. याकरिता स्त्रियांनी संविधान वाचावे, असे आवाहन वैदर्भीय कवयित्री मनीषा रिठे यांनी केले.स्थानिक माता मंदिर वॉर्ड येथे भारतीय संविधान जनजागृती अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या सभेत प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. माहितीअभावी महिलांना शोषण, अत्याचाराला बळी पडावे लागते. म्हणून भारतीय स्त्रियांनी एकदातरी संविधान वाचून आपले अधिकार व संरक्षणाविषयी असलेल्या तरतुदीची माहिती करुन घ्यावी, असे रिठे पुढे बोलताना म्हणाल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गीता मांडवकर होत्या. संयोजन समितीप्रमुख अनिल जवादे यांनी भारतीय संविधानाने दिलेले मुलभूत अधिकार, देशातील नागरिकाने पार पाडावयाची कर्तव्ये याची माहिती दिली. विचारमंचावर डॉ. मेघश्याम करडे, अनिता मावळे, प्राचार्य बी.एस. पाटील यांची उपस्थिती होती. त्यांनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक आर.के. पाटील, उपप्राचार्य गुडधे, समन्वयक डॉ. चंद्रकांत नगराळे, पर्यवेक्षक दिनेश वाघ, आनंद टिपले, माता मंदिर वॉर्ड कार्यक्रम प्रमुख प्रा. सूर्यकांत मावळे, प्रा. जयंत दाणी, गोपाल मांडवकर यांच्यासह शहरातील गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. उमेश ढोबळे यांनी केले.(तालुका प्रतिनिधी)