लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने सन २०१७-१८ या वर्षात योजना राबविण्यात शंभर टक्के यश मिळविले, अशी माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सोनाली अशोक कलोडे यांनी दिली आहे.१९ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेत सर्वसाधारण सभा होणार आहे. यात जिल्हा परिषदेचे सन २०१८-१९ चे सुधारीत अंदाजपत्रक मंजूर करण्यात येणार आहे. त्यानंतर १८-१९ च्या योजना राबविण्यात येईल. तत्पूर्वी मागील वर्षात शंभर टक्के योजना राबविण्यात महिला बालकल्याण विभागाला यश आले आहे. या विभागामार्फत ग्रामीण भागातील महिलांना ९० टक्के अनुदानावर शिलाई मशीन पुरविण्याकरिता ९ लाख रूपयाची तरतूद करण्यात आली होती. २८३ लाभार्थ्यांना सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात बॅँक खात्यात अनुदानाद्वारे रक्कम वर्ग करण्यात आली. तसेच ग्रामीण भागातील मुलींना व महिलांना स्वयंरोजगार, रोजगार, उद्योग मार्गदर्शन मेळावे शिबिर आयोजित करण्यात आले होते. दहा लक्ष रूपयाची तरतूद करण्यात आली होती. हा कार्यक्रमही संपूर्णपणे राबविण्यात आला. तसेच याच विभागामार्फत महिला जि.प. व पं.स. सदस्य, ग्रा.पं. सदस्य यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमावर ५ लक्ष रूपये निधी खर्च करण्यात आला. तसेच ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रांना टेबल व खुर्ची साहित्य वितरीत करण्यात आले. ४१६ टेबल व १ हजार २४८ खुर्च्या वाटप करण्यात आल्या. सातवी ते बारावी उत्तीर्ण मुलींना संगणक प्रशिक्षणाचा लाभ देण्यात आला. ७०३ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला तसेच महिला बालकल्याण विभागाने ९ अंगणवाडी सेविका व एक पर्यवेक्षिका, ९ मदतनीस यांनाही पुरस्कार देवून सन्मानित केले. तसेच ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी पर्यंतच्या शिक्षण घेणाऱ्या ४५७ मुलींना ३१ लाख ५० हजार ८०० रूपयाच्या निधीतून सायकल वितरीत करण्यात आल्या, अशी माहिती सभापती कलोडे यांनी दिली आहे.एकमेव विभाग ठरला अव्वलजिल्हा परिषदेत सर्वच विभाग निधी खर्च करण्यात व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत अग्रेसर नाही. महिला व बालकल्याण विभागाने मात्र अव्वल स्थान पटकाविले आहे. या विभागाने पाच ते सात योजना राबविल्या. यात शालेय विद्यार्थीनीपासून ते महिला, अंगणवाडी सेविका पर्यंत सर्वांच्या योजनेचा समावेश आहे.
निधी खर्चात महिला बालकल्याणचे शतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:13 AM
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने सन २०१७-१८ या वर्षात योजना राबविण्यात शंभर टक्के यश मिळविले, अशी माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सोनाली अशोक कलोडे यांनी दिली आहे.
ठळक मुद्देयोजनांची अंमलबजावणी : सोनाली कलोडे यांची माहिती