शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
5
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
6
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
7
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
9
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
10
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
11
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
12
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
13
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
14
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
15
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
16
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
17
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
18
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
19
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
20
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

महिला काँग्रेसचे थाळीनाद आंदोलन

By admin | Published: January 10, 2017 12:34 AM

पंतप्रधानांनी काळा पैसा बाहेर काढणे आणि दहशतवाद कमी करण्याचा उद्देश ठेवत नोटाबंदचा निर्णय घेतला.

नोटाबंदीचा निषेध : मार्ग काढण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना साकडे वर्धा : पंतप्रधानांनी काळा पैसा बाहेर काढणे आणि दहशतवाद कमी करण्याचा उद्देश ठेवत नोटाबंदचा निर्णय घेतला. मात्र हे दोन्ही उद्देश बाजून राहत असून या निर्णयामुळे सर्वसामान्य जनता होरपळली जात असल्याचा आरोप करीत महिला काँग्रेसच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले गेले. निवेदन उपजिल्हाधिकारी लोणकर यांनी स्वीकारले. शेतकऱ्यांना मिळत असलेल्या आधारभूत किमतीवर २० टक्के बोनस देण्यात यावा, दारिद्र्य रेषेखाली येत असलेल्या महिलांच्या बँक खात्यात २५ हजार रुपये जमा करा या दोन विशेष मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. यासह नोटबंदीचा निर्णय जाहीर झाला त्या दिवसापासून आतापर्यंत किती काळापैसा जमा झाला, भ्रष्टाचार कमी झाला काय, आदी प्रश्नही या निवेदनातून विचारण्यात आले आहेत. नोटबंदी जाहीर झाली त्या काळापासून अनेक एटीएम बंद अवस्थेतच आहेत. ते सुरू करण्यासंदर्भात काय निर्णय घेण्यात आला, तसेच त्यातून निघणाऱ्या पैशाची मर्यादा वाढविण्यात यावी, बँकेत असलेला शेतकरी व सर्वसामान्यांचा पैसा काढण्या संदर्भात असलेले निर्बंध हटविण्यात यावे, यासह अन्य महत्त्वपूर्ण मागण्यांकडेही निवेदनातून लक्ष वेधण्यात आले. सदभावना भवनातून मोर्चाला प्रारंभ झाला. हा मोर्चा जिल्हा कचेरी मार्गावर असलेल्या न्यायालयाच्या प्रवेशद्वार परिसरात पोहचताच पोलिसांनी मोर्चकरांना अडवून धरले. यानंतर महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मेघे यांच्या नेतृत्त्वात एका महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.