लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : अजूनही त्यांचे आईच्या कुशीत बसून सर्व हट्ट पुरवून घेण्याचे वय, दुधाचे दात अजूनही सुकलेले नाहीत, अशा अजाणत्या वयात त्या कोवळ्या कळ्या काही सैतानाच्या हव्यासाने गर्भगळीत झाल्या. नुकतेच उमलू लागलेल्या त्या कळ्यानी आपल्या असुरक्षित भविष्याची दाद मागण्यासाठी मोर्चा काढत येथील उपविभागीय महसूल कार्यालय गाठले. यावेळी विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या मोर्चात युवतींसह बालिका व महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.सदर निवेदनातून वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनासह सरकारने ठोस पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर बलात्कारासारखे निंदनिय प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणीही यावेळी करण्यात आली. उल्लेखनिय म्हणजे या मोर्चाचे नेतृत्त्व युवती व छोट्या मुलींनी केले. मोर्चा उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर धडकताच मोर्चाचे नेतृत्त्व करणाऱ्या युवतींच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे यांच्याशी संवाद साधत विविध मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले. यावेळी समाधान शेंडगे यांनी हिंगणघाट परिसरात अशा दुदैर्वी घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याविषयी आंदोलनकर्त्यांचे मत जाणून घेतले.छत्रपती शिवरायांनी स्वराज्यामध्ये ज्या पद्धतीच्या शिक्षेची तरतूद केली होती त्याच धर्तीवर अशा गुन्ह्याकरिता कठोर शिक्षेची तरतूद करण्यात यावी. अशा गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर मोर्चा उपविभागीय महसूल कार्यालयावर धडकला. मोर्चात स्मिता पांढरे, सारिका मानकर, नम्रता बकाने, समीक्षा चौधरी, राजश्री विरुळकर, सुरेखा खांडरे, वैशाली चरडे, टिनाली कुंभारे, आस्था मानकर, रिद्धी मानकर, विधी पांढरे, निधी चौधरी, गार्गी खांडरे, धनंजय बकाने, समीर पांढरे, रवी काटवले, उमेर खान, सचिन चरडे, नंदू वाघमारे, रमजान शेख, धनराज कुंभारे, देवा जोशी, सुरेश चौधरी, अनिल आडे, डॉ. प्रमोद गोहणे आदी सहभागी झाले होते.अधिकाºयांशी केली चर्चामोठ्या संख्येने महिला, युवती व बालिकांचा समावेश असलेल्या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाºयांना सादर करण्यात आले. निवेदन देताना उपविभागीय महसलू अधिकाºयांशी मुलींनी चर्चा केली.
अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी महिलांचा ‘एल्गार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 10:38 PM
अजूनही त्यांचे आईच्या कुशीत बसून सर्व हट्ट पुरवून घेण्याचे वय, दुधाचे दात अजूनही सुकलेले नाहीत, अशा अजाणत्या वयात त्या कोवळ्या कळ्या काही सैतानाच्या हव्यासाने गर्भगळीत झाल्या. नुकतेच उमलू लागलेल्या त्या कळ्यानी आपल्या असुरक्षित भविष्याची दाद....
ठळक मुद्देउपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना निवेदन : पीडितेला न्याय मिळवून देण्याकरिता युवतींसह बालिकाही आल्या पुढे