लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : साने गुरुजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडद येथे महिला सक्षमीकरण व युवती मेळावा घेण्यात आला. दक्ष नागरिक फाउंडेशन व साने गुरुजी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश सबाणे तर प्रमुख अतिथी सभापती जयश्री गफाट, ठाणेदार दिलीप ठाकुर, दत्तात्रय गुरव, प्रकाश खंडार, योगीता उईके, रमा भगत, गंगाधर जगताप, सागर सबाणे, नारायण डफरे, प्राचार्य सतीश जगताप, सुनील लोणकर उपस्थित होते.देशाची सुरक्षा करण्याची मोठी जबाबदारी आज बी.एस.एफ. द्वारे महिलांनी स्विकारली आहे. प्रगत व विज्ञानप्रिय समाज निर्मितीसाठी पुरुषांसह महिलांनी योगदान दिले आहे. त्यामुळे स्त्री-पुरुष असा भेदभाव करता येऊ शकत नाही. धकाधकीच्या या जीवनात स्त्रियांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. म्हणून शैक्षणिक व आर्थिक प्रगती साधताना स्त्रियांनी शारीरिक सुदृढतेवर भर द्यावा असे आवाहन सभापती गफाट यांनी केले. मेळाव्याला वडद, पालोती, सिरसगाव येथील महिला पालक, बचत गटाच्या कार्यकर्त्या व विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या. शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात महिलांचे योगदान तुल्यबळाचे आहे. मात्र आजही महिलांवरील अत्याचाराला पूर्णविराम मिळाला नाही, अशी खंत ठाकुर यांनी व्यकत केली. समाजातील स्त्रियांचे योगदान, समस्या व उपाययोजना या विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यानंतर हळदीकुंकू व उखाणे स्पर्धा झाली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सारीका डफरे यांनी केले तर आभार वर्षा इंगोले यांनी मानले.
महिला सक्षमीकरण व युवती मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 11:35 PM
साने गुरुजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडद येथे महिला सक्षमीकरण व युवती मेळावा घेण्यात आला. दक्ष नागरिक फाउंडेशन व साने गुरुजी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ....
ठळक मुद्देदक्ष नागरिक फाऊंडेशनचा उपक्रम : साने गुरूजी विद्यालयात आयोजन