शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

जिल्हा कचेरीवर महिलांचा मोर्चा

By admin | Published: January 11, 2017 1:02 AM

गरजूंना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात यावा, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : गरजूंना शासकीय योजनांचा लाभ मिळावा वर्धा : गरजूंना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात यावा, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी स्थानिक डॉ. आंबेडकर चौक येथून विदर्भ प्रदेश जेष्ठ नागरिक व निराधार अत्याचार मुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्त्वात महिलांनी मोर्चा काढला. हा मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकल्यावर येथे जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनातून संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्धापकाळ योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या मासिक अनुदानात १ हजार ५०० रुपये प्रमाणे सुधारणा करण्यात यावी, निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे उत्पन्नांची मर्यादा २१ हजार रुपये वरुन ३५ हजार रुपये करण्यात यावी, संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ वृद्धापकाळ योजनेतील लाभार्थ्यांना भारतात कुठेही आजन्म मोफत बसप्रवास सुविधा व मोफत आरोग्य सेवा देण्यात यावी, निराधारांना दर महिन्याला नियोजित अनुदान देण्यात यावे, दिव्यांग व निराधार तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शासनाच्या अंत्योदय व अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात यावा, घरगुती काम करणाऱ्या व हातमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना शासनाच्यावतीने वार्षिक १० हजार रुपये अनुदान देण्यात यावे, मायक्रोफायनांस कंपन्यांचे कर्मचारी व अधिकारी कर्ज वसुलीच्या नावाखाली महिलांना नाहक त्रास देत असून त्याच्याविरुद्ध कार्यवाही करीत महिलांना कर्जमाफी देण्यात यावी आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेल्या या मोर्चाला न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर पोलीसांकरवी अडविण्यात आले. यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. आंदोलनाचे नेतृत्त्व मंगला ठक, रमेश घोडे, गुड्डू शर्मा, अनिल गुलानी, अफसाना शेख, जाधव यांनी केले. यात मोठ्या संख्येने महिला सहभागी होत्या.(शहर प्रतिनिधी)