महिला लोक आयोगाची परिषद : आरोग्यविषयक समस्यांवर मार्गदर्शन लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : महाराष्ट्र राज्य महिला लोक आयोगाची परिषद घेण्यात आली. स्त्रियांच्या समस्या सक्षमपणे हाताळण्याचा निर्धार यावेळी उपस्थित सदस्यांनी केला. यानंतर वर्धा शाखेची मासिक सभा घेण्यात आली. या बैठकीत स्त्रियांच्या समस्यांंची मुळ कारणे, स्वरुप व उपाययोजना यावर विचार विनिमय केला. तसेच आयोगाने आतापर्यंत स्त्रियांचे आर्थिक शोषण, बलात्कार, घरगुती वाद, न्यायालयीन खटले याबाबतच्या सोडवलेल्या तक्रारीचा आढावा सादर केला. स्त्रिया व लहान बालकांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच त्यांना न्यायमिळेपर्यंत लढण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. यावेळी संगीता इंगळे, मिनल इथापे, पुष्पा मोहोड, विद्या राईकवार, मंजुषा चौगावकर, प्रतिभा वाळके, योगिता मानकर, किरण शेंद्रे, नंदिनी बर्वे व सदस्यांची उपस्थिती होती. बैठकीच्या दुसऱ्या टप्प्यात बालरोगतज्ञ डॉ. सुनिता दिक्षीत यांनी पौंगडावस्थेतील मुलामुलींना समजुन घेतांना या विषयावर मार्गदर्शन केले. किशोर वयात मुलामुलींमधील होणारे शारीरिक व मानसिक बदल, आजुबाजुच्या परिस्थितीचा त्यांच्यावर होणारा परिणाम समजुन घेवून पालकांनी आपली भूमिका कशी निर्धारीत करावी याचे मार्गदर्शन केले. उपस्थितांचे आभार सुचिता ठाकरे यांनी मानले.
महिलांच्या समस्या सक्षमपणे हाताळणार
By admin | Published: May 10, 2017 12:52 AM