शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

महिला धडकल्या जि.प. सदस्यांच्या घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:29 PM

सध्या गावातील महिलांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे;पण महिलांच्या या समस्येकडे ग्रा.पं. प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत गावातील जलसंकटावर मात करण्यासाठी तात्काळ योग्य पाऊल उचलण्यात यावे या मुख्य मागणीसाठी घागर घेऊन निघालेला महिलांचा मोर्चा सुरूवातीला ग्रा.पं. कार्यालयात पोहोचला.

ठळक मुद्देजलसंकटावर मात करण्याची रेटली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : सध्या गावातील महिलांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे;पण महिलांच्या या समस्येकडे ग्रा.पं. प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत गावातील जलसंकटावर मात करण्यासाठी तात्काळ योग्य पाऊल उचलण्यात यावे या मुख्य मागणीसाठी घागर घेऊन निघालेला महिलांचा मोर्चा सुरूवातीला ग्रा.पं. कार्यालयात पोहोचला. परंतु, तेथे सरपंच नसल्याचे लक्षात येताच महिलांनी आपला मोर्चा जि.प. सदस्य चंद्रकांत ठक्कर यांच्या घराकडे वळविला. महिलांनी ठक्कर यांचे निवासस्थान गाठून त्यांना महिलांची समस्या समजावून सांगितली.गावातील नागरिकांना नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची असली तरी २८ फेबु्रवारीपर्यंत सदर विभागाकडून नागरिकांना पाण्याचा पुरवठा करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पूर्वीच गावातील महिलांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना त्याकडे ग्रा.पं. प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यामुळे महिलांच्या अडचणीत भर पडली असून ग्रा.पं. प्रशासनाचे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी संतप्त महिलांनी हातात घागर घेऊन ग्रा.पं. कार्यालय गाठले. तेथे सरपंचच नसल्याचे लक्षात येताच महिलांनी आपला मोर्चा जि.प. सदस्य चंद्रकांत ठक्कर यांच्या निवासस्थानाकडे वळविला. ठक्कर यांचे निवासस्थान गाठल्यावर आंदोलनकर्त्या महिलांनी आपली अडचण जि.प. सदस्यांना सांगितली. त्यावर ठक्कर यांनी ग्रा.पं. प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योग्य सूचना केल्या. शिवाय आंदोलनाचा इशाराही दिला. आंदोलनात संगीता कामडी, वैशाली नरड, कल्पना घोडे, शशिकला हरणे, कल्पना बडे, इंदिरा नरड, संगीता तेलरांधे, वंदना देशमुख, शोभा ढोले, शोभा नरड, मंगला काटकर, कमला साठोणे, शशिकला वंदाडे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Waterपाणी