रोहणा : सदर कामाबाबात जितेंद्र जुवारे यांनी सरपंचाना काम चुकीचे आहे, ते सांगण्याचा प्रयत्न केला असता सरपंचांनी काम बरोबर आहे, असे सांगितले. यावेळी सरपंचांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप जुवारे यांनी केला आहे. त्यानंतर सदर कामाची फोन द्वारा तक्रार तहसीलदार आर्वी यांना करून आपण मोक्यावर येवून आम्हाला न्याय द्या असा आग्रह आक्षेपधारकांनी केला. यावरून सोमवारी आर्वी तहसीलदारांनी मोक्यावर येत आक्षेपधारकांचे म्हणणे ऐकून घेतले व नदीचा मूळ नकाशात आणि परिसरातील सर्व्हे क्रमांकाचा नकाशा निवेदनासह देण्याच्या सूचना केल्या. जोपर्यंत या प्रकरणी निर्णय होत नाही, तोपर्यंत काम बंद राहील अशा सूचनाही त्यांनी केल्या. अधिक माहिती घेतली असता आक्षेपधारकांनी मंगळवारी तहसीलदार आर्वी यांना महसूल विभागाकडून नदीपरिसराचा नकाशा मिळवून संपूर्ण कागदपत्रांसह निवेदन सादर केल्याचे समजते. तसेच निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी आर्वी व जिल्हाधिकारी वर्धा यांना दिल्याचेही समजते. विशेष म्हणजे मोका पाहण्यासाठी तहसीलदार आलेले असताना त्यावेळी सरपंच उपस्थित नसल्याचे समजते. त्यामुळे यासंदर्भातील त्यांची भूमिका समजली नाही. एकंदरीत राजकारण रहीत असलेल्या वॉटर कप स्पर्धा २ ला रोहण्यात राजकारणाचा वास लागल्याने गावात हा चर्चेला विषय ठरला आहे.(वार्ताहर)
तहसीलदारांच्या हस्तक्षेपाने काम बंद
By admin | Published: April 19, 2017 12:43 AM