बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : पुलाची तांत्रिक तपासणी करण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कसेलू : येथील बसस्थानक ते संताजी मंगल कार्यालयपर्यंतच्या रस्त्यावरील दोन पुलाच्या रुंदीकरणाचे काम करण्यात येत आहे; पण या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असून बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. तसेच वडगाव रस्त्याचे रुंदीकरण करुन सिमेंटीकरण होत आहे. या मार्गावरील प्रस्तावित पुलाच्या बांधकामात प्राकलनानुसार साहित्य वापरण्यात येत नसून दोन्ही पुलाची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी आहे. रस्त्याचे रूंदीकरण होत असल्याने या पुलाचे रुंदीकरण करुन नव्याने बांधकाम केले जात आहे. यात जुना पूल न तोडताच त्याला जोड देऊन रूंदीकरण होत आहे. वाढीव पुलावर स्लॅब टाकण्यासाठी बांधलेल्या सळाखी पाहिल्या तर एखाद्या नालीवर रपटा टाकण्यात येत आहे, असेच जाणवते. ही बाब नागरिकांच्या लक्षा येते तर बांधकाम विभागातील कर्मचारी व अधिकारी यांच्या का नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. असेच जर बांधकाम केले तर अल्पावधीत पूल कोसळण्याची शक्यता आहे. जुना पूल सिमेंट पाईपचा आहे. त्यामुळे या पाईपमधून पावसाळ्यात पाण्याचा वेगवान झोत असला तर निचरा होत नाही. या पुलाची रुंदी वाढविताना पाईप न काढताच उर्वरित भागावर स्लॅब टाकण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्याचा प्रश्न कायम आहे. येथील रहिवाशांच्या घरात पुलाजवळ साचलेले पाणी शिरण्याचा धोका आहे. पुलाच्या बांधकामात वापरण्यात येत असलेले साहित्य नित्कृष्ट दर्जाचे आहे. पुलाचे बांधाकम तांत्रिकदृष्टया सदोष असून अत्यंत कमी जाडीच्या सळाखीचा यात वापर होत आहे. सळाखी हातानीच ठोकून क्राँकीट टाकले जात आहे. असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे फिरकुन पाहत नसल्याने सदर प्रकार राजरोसपणे सुरू आहे. निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर होत असल्याचा नागरिकांचा आरोपरस्त्याचे बांधकाम करीत असलेल्या कंत्राटदाराला याचा जाब विचारून दर्जेदार साहित्य वापरण्याची ताकीद द्यावी अशे नागरिकांची मागणी आहे. या रस्त्यावरील दोन्ही पुलाची तांत्रिक तपासणी झाल्याशिवाय क्राँकीट टाकण्याचा प्रयत्न केल्यास ते काढून टाकु, असा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे. पुलाच्या दर्जेदार बांधकामाची मागणी आहे.माझ्या घरासमोर पुलाचे काम सुरू आहे. पहिला पूल छोट्या सिमेंट पाईपचा आहे. त्यामुळे याला तोडून नव्याने मोठा पूल करुन पाईप काढून स्लॅब टाकला नाही तर येथील रहिवाशांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे.- सी.आर. महाकाळकर, नागरिक.
पुलाच्या रूंदीकरणाचे काम निकृष्ट
By admin | Published: June 05, 2017 1:07 AM