लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : सिटू संघटनेच्या वतीने आशा वर्कर, शालेय पोषण आहार कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांना घेऊन तहसीलसमोर निदर्शने करण्यात आली.आंदोलनाचे नेतृत्व सिटूचे वर्धा जिल्ह्याचे नेते यशवंत झाडे, शेतमजूर युनियन राज्य कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप शापामोहन व किसान सभा अमरावती जिल्हा सचिव महादेव गारपवार यांनी केले. आशा वर्कर व शालेय पोषण आहार कामगारांना दरमहा १८ हजार रुपये मानधन द्या, सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या तसेच आहार योजनेचे खासगीकरण करणे हाणून पाडा, संपूर्ण आष्टी तालुक्यात मनरेगाची कामे सुरू करा आदी मागण्यांना घेऊन ९ जानेवारी रोजी मोर्चा तहसीलवर धडकला. कामगारांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी निदर्शने दिली.तहसीलदारांना शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन सादर केले. आंदोलनात मोठ्या संख्येने महिला तसेच पुरुष कामगार सहभागी झाले होते. यामधे संध्या संभे, अनिता राऊत, पार्बती राऊत , अरुणा मनवरे , मंगला मनवरे , पुष्पा इंगळे, मनोहर ठाकरे, संजय कुयटे आदी प्रामुख्याने सहभागी होते.
आष्टी तहसीलसमोर कामगारांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 10:18 PM
सिटू संघटनेच्या वतीने आशा वर्कर, शालेय पोषण आहार कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांना घेऊन तहसीलसमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व सिटूचे वर्धा जिल्ह्याचे नेते यशवंत झाडे, शेतमजूर युनियन राज्य कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप शापामोहन व किसान सभा अमरावती जिल्हा सचिव महादेव गारपवार यांनी केले.
ठळक मुद्देविविध मागण्या : सिटूच्या नेतृत्वात तहसीलदारांमार्फत शासनाला दिले निवेदन