लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आयुर्वेदा फॉर ग्लोबल वेल बीर्इंग’ या विषयावर सावंगीत जागतिक परिषदेचे आयोजन केले आहे. या माध्यमातून भारतीय चिकित्सा पद्धतीचा प्रसार आणि प्रचार करण्यात येणार आहे. सात वेगवेगळ्या क्षेत्राचा यात अंतर्भाव करून ३३ उपविषयांवर तज्ज्ञ, संशोधक विचारांची आदानप्रदान करतील. दत्ता मेघे इन्स्टीट्युट आॅफ मेडिकल सायन्सेस अभिमत विद्यापीठाच्या अंतर्गतच्या महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व अनुसंधान केंद्र सालोड (हिरापूर) यांच्या वतीने दि. १९ ते २१ जानेवारी दरम्यान ही परिषद होणार आहे, अशी माहिती पत्रपरिषदेत सिली.आयोजन समितीने घेतलेल्या पत्रपरिषदेला कुलगुरू डॉ. राजीव बोरले, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा, विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, डॉ आजनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.या तीन दिवसीय परिषदेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलपती माजी खासदार दत्ता मेघे यांच्या हस्ते, आयुष मंत्रालयातील सल्लागार डॉ. मनोज नेसरी, आयुष महाराष्टÑाचे संचालक डॉ. कुलदीपराज कोहली, महाराष्टÑ कॉन्सिल आॅफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता, सी.सी.आय.एम. चे माजी उपाध्यक्ष डॉ. अमिताभकुमार पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले असतील. या परिषदेत देशविदेशातील ३३६ शोध निंबध, ५५ पोस्टर्स, १५ तज्ञ मार्गदर्शक २१ सत्रांमधून भूमिका मांडतील. १००० प्रतिनिधी यात सहभागी होणार असून ५० विदेशी प्रतिनिधींचा समावेश असेल. जीवन जगण्याची समृद्ध पद्धत असलेल्या आयुर्वेदाचा उहापोह या माध्यमातून होणार आहे.या परिषदेला डॉ. जोस रॉगीव्ह (ब्राझील), डॉ. लाल हिंगारानी (अहमदाबाद), डॉ. अविनाश लेले (पुणे), डॉ. जी.जी. गंगाधरन (बंगलोर), डॉ. एस.एन. गुप्ता (नाडीयाड), डॉ. गौरंग जोशी (राजकोट), डॉ. डॅनीयल (रोमानीया), डॉ. निशतेश्वर (जामनगर), डॉ. वंदना सिरोहा (दिल्ली), डॉ. जॉकीन जॉर्ज (पोर्तूगाल), डॉ मारूफ आनीफ (लंडन), डॉ. व्यंकट जोशी (लंडन), डॉ. श्रीकांत (दिल्ली), डॉ. गोपालकुमार (केरळ) या तज्ज्ञांची उपस्थिती राहणार असून ते मार्गदर्शन करणार असल्याची माहिती यावेळी दिली.
सावंगीत आयुर्वेदावर जागतिक परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:46 PM
आयुर्वेदा फॉर ग्लोबल वेल बीर्इंग’ या विषयावर सावंगीत जागतिक परिषदेचे आयोजन केले आहे. या माध्यमातून भारतीय चिकित्सा पद्धतीचा प्रसार आणि प्रचार करण्यात येणार आहे. सात वेगवेगळ्या क्षेत्राचा यात अंतर्भाव करून ३३ उपविषयांवर तज्ज्ञ, संशोधक विचारांची आदानप्रदान करतील.
ठळक मुद्देजगभरातील तज्ज्ञांची उपस्थिती : सात विविध क्षेत्रांचा अंतर्भाव