लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथील हळद साता समुद्रापार ओमान देशात जाणार आहे. याबाबतचा निर्यात करार १५ आॅगस्ट रोजी ओमान सरकारच्या प्रतिनिधीसोबत जिल्ह्यातील अधिकारी व लोकप्रतिनिधी करणार आहेत. वर्धा जिल्ह्यातील हळद उत्पादकांच्या दृष्टीने हा सोनेरी क्षण आहे.वायगाव हळदीला नुकतेच मानांकन प्राप्त झाले आहे. भौगोलिक उपदर्शन जिओग्राफिकल इंडिगेशन चेन्नईच्या सर्वेक्षणात वायगाव या हळदीमध्ये कर्क्यूमिन हा औषधी घटक सहा टक्के अधिक असल्याचे सिद्ध झाले आहे. अनेक पिढ्यांपासून येथील शेतकरी हळदीची लागवड करीत भरघोस पीक घेतात. भारतातच नव्हे तर जागतिक बाजारपेठेत येथील हळदीची ख्याती आहे.पाच वर्षांपूर्वी सेलम जातीच्या हळदीला पर्याय म्हणून वायगाव हळदीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उद्यान विद्या शाखेच्या शास्त्रज्ञांनी संशोधन केले. यात इतर जातीच्या तुलनेत येथील हळदीमध्ये कर्क्यूमिनचे प्रमाण अधिक असल्याचे सिध्द झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या हळदीची मागणी वाढू लागली. त्यामुळे आता ओमान देशात ही हळद निर्यात केली जाणार आहे. वायगाव हळद उत्पादन कंपनी व एसडीएफ या ओमान देशातील कंपनीसोबत हळद निर्यात करार वर्धा येथे १५ आॅगस्ट रोजी इव्हेंट सभागृहात होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, खा. रामदास तडस, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अॅड. सुधीर कोठारी, आ. समीर कुणावार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर आदी उपस्थित राहणार आहे. ओमान सरकारतर्फे मुख्यधिकारी एसाम अली नाजर व विनायक काशीद यांच्यासोबत हा करार होणार असल्याची माहिती वायगाव हळद उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधीने दिली.
वर्धा जिल्ह्यातील वायगाव हळद ओमानला जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:11 PM
वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथील हळद साता समुद्रापार ओमान देशात जाणार आहे. याबाबतचा निर्यात करार १५ आॅगस्ट रोजी ओमान सरकारच्या प्रतिनिधीसोबत अधिकारी व लोकप्रतिनिधी करणार आहेत.
ठळक मुद्देस्वातंत्र्यदिनी करार ओमान सरकारसोबत लोकप्रतिनिधींची बैठक