लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : विद्या विकास कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समुद्रपूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने प्रा. अभय बावणे यांच्या स्मृतीत आयोजित ‘स्वरांजली’ या १९ व्या विदर्भस्तरीय गीतगायन स्पर्धेत यवतमाळचा श्रीकांत टकले प्रथम पुरस्काराचा मनकरी ठरला. तर ब्रह्मपुरीची प्रणाली पाटील व नागपूरची श्रीया मेंढी अनुक्रमे द्वितीय व तृतीय बक्षीसचे मानकरी ठरले.समारोपीय कार्यक्रमात त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत विदर्भातील ५६ गायक सहभागी झाले होते. अंतिम फेरीकरिता १४ स्पर्धकांची निवड करण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव पांडूरंग तुळसकर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष शीला सोनारे, डॉ. केशव वाळके, प्राचार्य रमेश बोभाटे, शांतीलाल गांधी, डॉ. निलेश तुळसकर, श्याम अलोणी, सुधीर खडसे, भरत सामतानी, प्रकाश भोले, प्रा. किरण वैद्य, प्रा. विलास बैलमारे, गणेश महाकाळकर यांची उपस्थिती होती. प्रथम विजेता श्रीकांत टकले याला स्व. डॉ. सुधीर खेडूलकर यांच्या स्मृतीत पुरस्कार देण्यात आला. किशोर दिघे यांनी त्याला सन्मानित केले. तर प्रणाली पाटील हिला धनराज गोल्हर यांनी तर श्रेया मेंढी यांना प्रकाश भोळे यांनी सन्मानित केले. शिवाय चतुर्थ पुरस्कार मुकेश मेहरा चंद्रपूर याला आशीष पर्बत यांच्याकडून तर पाचवा पुरस्कार ओम गणेश महाकाळकर यांच्या कडून तिघांना देण्यात आला. यावेळी दहा स्पर्धकांना प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करण्यात आले. बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आ. समीर कुणावार तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. उमेश तुळसकर, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, डॉ. राजविलास कारमोरे, गजानन देशमुख, धनराज गोल्हर, दादा देशकरी, चंद्रकांत माळवे आदींची उपस्थिती होती. परिक्षक म्हणून सुनील वाघमारे, जयंत भिरंगे, प्रा. सालबर्डे व अरूण सुरजुसे यांनी काम पाहिले.
यवतमाळचा श्रीकांत टकले ठरला ‘स्वरांजली’चा विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 11:21 PM
विद्या विकास कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समुद्रपूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने प्रा. अभय बावणे यांच्या स्मृतीत आयोजित ‘स्वरांजली’ या १९ व्या विदर्भस्तरीय गीतगायन स्पर्धेत यवतमाळचा श्रीकांत टकले प्रथम पुरस्काराचा मनकरी ठरला.
ठळक मुद्देगीतगायन स्पर्धा : विदर्भातील ५६ गायकांचा सहभाग