शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

रिडिंग घेत मिळणार कागदावरील विद्युत देयक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 5:00 AM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५ मार्च २०२० पासून विद्युत मिटर वाचन व कागदी विद्युत देयक वितरणाची कामे बंद करण्यात आली होती. शिवाय आनलाईन पद्धतीचा वापर करून ग्राहकांनी महावितरणकडे मिटर रिडिंग पाठविण्यासह विद्युत देयक अदा करण्याचे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले होते. या आवाहनाला अनेक ग्राहकांनी प्रतिसाद देत ऑनलाईन पद्धतीचा वापर करून देयकही अदा केले.

ठळक मुद्देसंभ्रम होणार दूर : महावितरणला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली परवानगी

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे घरोघरी जाऊन मिटर रिडिंग घेण्यासह कागदी विद्युत देयक देण्याच्या विषयाला ब्रेक लागला होता. त्यानंतर ग्राहकांची होणारी फरपट व महावितरणचे होणारे नुकसान लक्षात घेऊन वर्धा जिल्हा प्रशासनाने मिटर रिडिंगसह कागदी विद्युत देयक वितरण करण्याच्या विषयाला हिरवीझेंडी दिली आहे. त्यामुळे आता नागरिकांना दिलासा मिळणार आहे.प्राप्त माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५ मार्च २०२० पासून विद्युत मिटर वाचन व कागदी विद्युत देयक वितरणाची कामे बंद करण्यात आली होती. शिवाय आनलाईन पद्धतीचा वापर करून ग्राहकांनी महावितरणकडे मिटर रिडिंग पाठविण्यासह विद्युत देयक अदा करण्याचे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले होते. या आवाहनाला अनेक ग्राहकांनी प्रतिसाद देत ऑनलाईन पद्धतीचा वापर करून देयकही अदा केले. परंतु, ग्रामीण भागातील अनेक नागरिकांकडे स्मार्ट फोन नसल्याने त्यांच्यासाठी ही प्रक्रिया किचकट आणि अडचणीत भर टाकणारी ठरत असल्याचे लक्षात आल्यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कागदी देयक वितरणासह घरोघरी जाऊन मिटर वाचनाबाबतची परवानगी मागितली. महावितरणच्या विनंतीवर सहानुभूतीपूर्वक विचार करून जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी त्याला हिरवीझेंडी दिल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात ४.५८ लाख ग्राहकवर्धा जिल्ह्यातील ४ लाख ५८ हजार ७४५ कुटुंबाला महावितरण कंपनी विद्युत पुरवठा करते. कागदी विद्युत वितरणासह विद्युत मिटर वाचनावर बंदी आल्यावर एप्रिल महिन्यात ३३ हजार ४४९ ग्राहकांनी आॅनलाईन पद्धतीचा वापर करून विद्युत देयकाची एकूण ३ कोटी ७३ लाख ३३ हजार ५२१ रुपयांची रक्कम महावितरणकडे अदा केली आहे. तर मे महिन्यात ४० हजार ६८२ ग्राहकांनी ६ कोटी ८ लाख २८ हजार १६२ रुपयांची रक्कम अदा केल्याचे सांगण्यात आले.मिटर वाचनासह कागदी विद्युत देयक वितरणासाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी मिळाल्याने ग्राहकांना आता सरासरी देयक न देता इंत्यभूत देयक दिली जाणार आहे. त्यामुळे विद्युत देयकाच्या कामात अधिक पारदर्शकता येईल. शिवाय प्रत्येक्ष मिटर वाचनासह कागदी देयक वितरणाचे काम येत्या दोन ते तीन दिवसात सुरू होईल.- डॉ. सुरेश वानखेडे, अधीक्षक अभियंता, महावितरण, वर्धा.या प्रमुख अटींचे करावे लागेल पालनरिडिंग धारकांचे त्यांचेकडे असलेले वाहनाचे निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे. तसेच मिटर वाचन करणाºयाला सॅनिटायझरचा वापर करावा लागणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्याची वैद्यकीय तपासणी करूनच हे काम करावे लागणार आहे.प्रत्येक १५ दिवसांनी सदर कर्मचाऱ्याला आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी लागणार आहे.संबंधित व्यक्तीला जिल्ह्याबाहेर ये-जा करण्यास प्रतिबंध राहणार आहे.मिटर वाचन व विद्युत देयक वितरीत करणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करणे अनिवार्य राहणार आहे.सदर व्यक्तीची प्रकृती बिघडल्यास त्याला त्याची माहिती तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक राहणार आहे.

टॅग्स :electricityवीज