लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळखुटा : झुडूपात दबा धरून बसून असलेल्या बिबट्याने गवत कापत असलेल्या तरुणावर अचानक हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले. याप्रसंगी तरुणाने आरडा-ओरड केल्याने बिबट्याने जंगलाच्या दिशेने धुम ठोकली. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून संदीप उत्तम धांदे, असे जखमी तरुणाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, पिंपळखुटा येथील रहिवासी असलेला संदीप धांदे हा सकाळी १० वाजताच्या सुमारास शेतात गवत कापत होता. दरम्यान त्याच्यावर झुडूपात लपून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढविला. यावेळी संदीपने आरडा-ओरड केल्याने परिसरातील शेतकरी त्याच्या मदतीसाठी धावून आले. दरम्यान बिबट्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. या घटनेत संदीप धांदे हा गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पावडे, कावडे, गजभिये, इंगळे यांनी घटनास्थळ गाठून बारकाईने पाहणी केली. प्रत्यक्ष दर्शियांच्या मते संदीपवर हल्ला करणारा वन्यप्राणी बिबट असल्याचे वन विभागाच्या आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले आहे. जखमीच्या कुटुंबियांना वन विभागाने तातडीने शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.वन्यप्राण्यांची शेतशिवाराकडे धावपिंपळखुटा शेतशिवाराला लागून असलेल्या जंगलात बिबट, वाघ, अस्वल आदी हिंसक वन्यप्राणी आहेत. परंतु, सध्या नैसर्गिक पानवटे आटल्याने या वन्यप्राण्यांनी शेतशिवारांकडे धाव घेतल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. बहूदा वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ गावांकडे येत असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 12:07 AM
झुडूपात दबा धरून बसून असलेल्या बिबट्याने गवत कापत असलेल्या तरुणावर अचानक हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले. याप्रसंगी तरुणाने आरडा-ओरड केल्याने बिबट्याने जंगलाच्या दिशेने धुम ठोकली.
ठळक मुद्देपरिसरात दहशत : जखमीला सेवाग्राम रुग्णालयात केले दाखल