वर्धा : संत गजानन महाराज यांच्या प्रकटदिन सोहळ्याचे औचित्य साधून शनिवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे पालखी सोहळा पार पडला. याच पालखी सोहळ्यात सुमारे ५ कि.मी.च्या पालखी मार्गावर वर्धेतील तरुण-तरुणींनी आकर्षक रांगोळी रेखाटून मार्ग सुशोभित केला. या तरुण कलावंतांनी आपल्या कलेतून श्रींना अभिवादन केले.
वर्धेतील रमण आर्टच्या माध्यमातून या तरुण-तरुणी एकत्र आल्या आहेत. गत वर्षीही या तरुण-तरुणींनी शेगाव गाठून पालखी मार्गावर आकर्षक रांगोळी काढली होती. तर यंदाही त्यांनी हा उपक्रम राबविला. त्यांना या कार्यासाठी ९०० किलो रंगीत रांगोळी तर ५०० किलो पांढरी रांगोळी वापरली.
शेगावच्या ५ किमीच्या पालखी मार्गावर वृषाली हिवसे, चित्रा माकोडे, शुभांगी फुरजेकर, रुपाली खडतकर, शुभांगी पोहाणे, श्रद्धा तिवारी, आचल तिवारी, पुजा तुरणकर, सागर बावणे, चंद्रकांत सहारे, अमोल चवरे, अजय उईके, गौरव डेहनकर, लोकेश घुरसे, आकास पाटमासे, उमेश काळे, युगा माकोडे, राहूल उमरे, प्रतीक्षा राऊत, सारीका काळे, रमन हिवसे, नंदन हिवसे, कलावती हिवसे, अमीत अमृतकर, अमोल हिवसे, डॉ. ज्ञानेश ढाकुलकर, वर्षा ढाकुलकर, वैशाली झाडे, अनंत झाडे यांनी आकर्षक रांगोळी रेखाटल्या.
श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांनी या सेवेची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. त्यामुळे आम्ही स्वत:ला धन्य मानतो.- वृषाली हिवसे, वर्धा.