लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : सेवाग्राम ही गांधीजींची कर्मभूमी व प्रयोग भूमी राहिली आहे. गांधीजी बद्दल आपण नेहमी एकत असतो. विचार करत़ो. बापूंना खरोखर समजून घ्यायचे असेल तर आजच्या युवक व युवतींनी त्यांचे विचार आत्मसात करावा लागेल. तरच गांधी समजेल, असे प्रतिपादन सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू यांनी केले.सेवाग्राम आश्रम परिसरातील महादेव भाई भवन मध्ये युवक व युवतींसाठी तीन दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराच्या उद्घाटनपर कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही, ज्योती कोरडे, दीप्ती लखूम, किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे, बजरंग सोनवने आदींची उपस्थिती होती.प्रभू पुढे म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची कर्मभूमी आहे. भगवान गौतम बुद्धांनी शांतीचा मंत्र दिला. तर महात्मा गांधी यांनी सत्य-अहिंसेचा संदेश देत स्री- पुरूष समानता क्रुतीतून आपल्या समोर ठेवली. आपण याची सुरूवात घरातून करावी. इंग्रजी भाषेला आपण सध्या जास्त महत्त्व देत असून ही चिंतेची बाब आहे, असे सांगितले.महादेव विद्रोही म्हणाले की, शिबीर स्थळाचे नाव महादेव भाई भवन आहे. याच महत्त्व आपण जाणले पाहिजे. गांधीजींनी समानता अंगीकारली होती. आर्थिक समानतेशिवाय सामाजिक समानता निर्माण होणार नाही. यावर बापूंचा विश्वास होता. छत्तीसगड राज्य नैसर्गिकरित्या संपन्न; पण सर्वात गरीबी तेथे दिसून येते. गांधी विचार शिबिरार्थ्यांनी समजावून घेतले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी ज्योती कोरडे, दीप्ती लखूम यांनीही विचार व्यक्त केले. परिचय अविनाश काकडे, बजरंग भाई यांनी करून दिला. संचालन अविनाश सोमनाथे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जयेश शेलार यांनी मानले. शिबिरात ७० युवक- युवती सहभागी झाले आहेत.
युवकांनी गांधीजींचे विचार अंगिकारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:49 PM
सेवाग्राम ही गांधीजींची कर्मभूमी व प्रयोग भूमी राहिली आहे. गांधीजी बद्दल आपण नेहमी एकत असतो. विचार करत़ो. बापूंना खरोखर समजून घ्यायचे असेल तर आजच्या युवक व युवतींनी त्यांचे विचार आत्मसात करावा लागेल.
ठळक मुद्देटी.आर.एन. प्रभू : तीन दिवसीय शिबिर