शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

बोरगावच्या युवकाचा गोव्याला समुद्रात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 5:50 PM

 शहरातील एका कॅटरींगमध्ये कामावर असलेल्या बोरगाव (मेघे) येथील युवकाचा गोवा येथे समुद्रात बुडून करुण अंत झाला. ही घटना २१ मे रोजी कलंगुट बीचवर घडली. आशिष संजयराव रामटेके (२०), असे मृत युवकाचे नाव आहे. 

 वर्धा - शहरातील एका कॅटरींगमध्ये कामावर असलेल्या बोरगाव (मेघे) येथील युवकाचा गोवा येथे समुद्रात बुडून करुण अंत झाला. ही घटना २१ मे रोजी कलंगुट बीचवर घडली. आशिष संजयराव रामटेके (२०), असे मृत युवकाचे नाव आहे. शहरातील एका कॅटरींगमध्ये आशिष कार्यरत होता. सदर कॅटरींग कंपनीला गोवा येथे एक आॅर्डर मिळाली. यावरून बोरगाव, वर्धा परिसरातील दहा युवक गोवा येथे गेले होते. ते १९ मे रोजी वर्धेतून रवाना झाला. आॅर्डरचे काम आटोपल्यानंतर २१ मे रोजी सर्व मित्र कलंगुट बीचवर फिरायला गेले होते. दरम्यान, काही मित्र समुद्रात उतरले. यातील एक मित्र समुद्राच्या खोल पाण्यात जात असल्याचे आशिषच्या लक्षात आले. यामुळे त्याने त्या मित्राला वाचविण्याचा प्रयत्न केला. हे करीत असतानाच मोठी लाट आल्याने मित्र तर वाचला; पण आशिष रामटेके याचा पाण्यात बुडून करुण अंत झाला. या घटनेमुळे रामटेके कुटुंबीय तथा त्याच्या मित्र परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

टॅग्स :Deathमृत्यूgoaगोवाnewsबातम्या