लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : नोटाबंदीमुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ करून सर्वसामान्य जनतेला संकटाच्या खाईत लोटणाऱ्या बेजबाबदार आणि निष्क्रिय सरकारचा युवक काँग्रेसच्यावतीने जाहीर निषेध नोंदविण्यात आला. आमदार रणजित कांबळे यांच्या मार्गदर्शनात शुक्रवारी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विपीन राऊत यांच्या नेतृत्वात काँग्रेस कमिटी कार्यालयापासून ते तहसीलपर्यंत मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी पेट्रोल पंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी काळे फासले.मागील तीन दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरामध्ये घसरण होत असताना सुद्धा दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल आणि गॅसची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेला याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या झोपी गेलेल्या सरकारला अजूनपर्यंत जाग आला नाही. या बेजबाबदार आणि निष्क्रिय सरकारचा जाहीर निषेध नोंदवत युवक काँग्रेसच्यावतीने देवळी येथे मोर्चा काढण्यात आला.यावेळी माजी सभापती मनोज वसू, जिल्हा महासचिव राहुल सुरकार, विपुल ताडाम, उपाध्यक्ष विराज शिंदे, विधानसभा अध्यक्ष निलेश ज्योत, उपाध्यक्ष जय जगताप, सोनू गावंडे, पवन अवाड, स्वप्निल कामडी, विक्की ताडाम, लाला बासू, विशाल दाते, अनिकेत दाते, सचिन बोबडे, निखील नरसिंगकर, गजानन पाटणकर, मीरान पटेल, तसेच युवक काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधानांच्या प्रतिमेला युवक काँग्रेसने फासले काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:33 AM
नोटाबंदीमुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ करून सर्वसामान्य जनतेला संकटाच्या खाईत लोटणाऱ्या बेजबाबदार आणि निष्क्रिय सरकारचा युवक काँग्रेसच्यावतीने जाहीर निषेध नोंदविण्यात आला.
ठळक मुद्देदेवळीत आंदोलन : तहसीलदारांना दिले निवेदन