लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पेट्रोल, डिझल व गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. मोदी सरकार महिलांना सन्मान देण्याच्या बाता करीत आहे.परंतु या भाववाढीमुळे महिलांचेही बजेट कोलमडल्याने डोळ्यात अश्रू आले आहे. निवडणुक काळात दिलेले आश्वासन हवेतच असल्याने या सरकारच्या कार्य पध्दतीचा निषेध करण्यासाठी वर्धा जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने वर्धा आणि हिंगणघाट येथे ‘लॉलीपॉप’ आंदोलन करुन ग्राहकांना निषेध पत्रके वाटण्यात आली.वर्ध्यातील आरती चौकातील पेट्रोल पंपावर वर्धा विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गौरव देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करुन या पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांना आंदोलनकर्त्यांनी लॉलीपॉप व निषेध पत्रक वाटून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला.यावेळी काँग्रेसचे जिल्हा महासचिव अबिद शेख, महासचिव नितीन इंगळे, वर्धा विधानसभा अध्यक्ष कुणाल भाकरे, मंगेश काळे, आदित्य खुनकर, प्रतिक राऊत, संकेत कार्लेकर, विनय धवने, मयुर नवघरे, राहूल मेहेरे, निखिल देशमुख, रवि कडू, चेतन कडू, प्रसाद मुरडीव, सक्षिल खुणकर, आदित्य ठाकरे, गौरव काखे, सुयोग खंदारे, विपिन सोनोने, मेहूल खाडे, अमन ढमने, आकाश गुबरे, वैष्णव खरावे, शुभम पांडे व कार्यकर्ते उपस्थित होते.हिंगणघाट येथे ही केला सरकारचा निषेधहिंंगणघाट विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विपीन राऊत व हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष नकुल भाईमारे यांच्या नेतृत्वात इंधन दरवाढीचा निषेध करीत पेट्रोल पंपावरील ग्राहकांना निषेध पत्रक वाटले. तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदनही पाठविण्यात आले.या आंदोलनात हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
इंधन दरवाढी विरोधात युवक काँग्रेसचे ‘लॉलीपॉप’आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:29 PM
पेट्रोल, डिझल व गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. मोदी सरकार महिलांना सन्मान देण्याच्या बाता करीत आहे.परंतु या भाववाढीमुळे महिलांचेही बजेट कोलमडल्याने डोळ्यात अश्रू आले आहे. निवडणुक काळात दिलेले आश्वासन हवेतच असल्याने या सरकारच्या कार्य पध्दतीचा निषेध करण्यासाठी वर्धा जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने वर्धा आणि हिंगणघाट येथे ‘लॉलीपॉप’ आंदोलन करुन ग्राहकांना निषेध पत्रके वाटण्यात आली.
ठळक मुद्देसरकारवर रोष : पेट्रोलपंपावर ग्राहकांना वाटले निषेध पत्रक