शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

चिनी वस्तूंची होळी करून नोंदविला तरुणांनी निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 2:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सणासुदीच्या दिवसात नागरिकांकडून चिनी बनावटीच्या वस्तुंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. चीनसाठी भारत हा मोठी बाजारपेठ आहे. सद्या भारत चीन संबधात तणाव निर्माण झाला आहे. त्याला धडा शिकविण्यासाठी नागरिकांनी चिनी बनावटीच्या वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करीत केंद्र सरकारने चीन बाबत ठोस भुमिका घ्यावी या मागणीसाठी शुक्रवारी ...

ठळक मुद्देबहिष्काराचे आवाहन : युवा परिवर्तन की आवाजचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सणासुदीच्या दिवसात नागरिकांकडून चिनी बनावटीच्या वस्तुंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. चीनसाठी भारत हा मोठी बाजारपेठ आहे. सद्या भारत चीन संबधात तणाव निर्माण झाला आहे. त्याला धडा शिकविण्यासाठी नागरिकांनी चिनी बनावटीच्या वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करीत केंद्र सरकारने चीन बाबत ठोस भुमिका घ्यावी या मागणीसाठी शुक्रवारी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्वात तरुण-तरुणींनी स्थानिक शिवाजी चौकात चिनी बनावटीच्या वस्तुंची होळी केली.आंदोलनादरम्यान तरूण- तरूणींनी चिनी बनावटीच्या वस्तुंची होळी करून आपला रोष व्यक्त केला. चीन हा देश भारताला युद्ध करण्यासाठी परिस्थिती निर्माण करीत आहे. त्याच्या कारवायांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणाम चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी केंद्र सरकार योग्य पाऊल उचलावे अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली. तरुण-तरूणींनी जोरदार नारेबाजी करून चीनच्या भारत विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. आंदोलनात निहाल पांडे, पलाश उमाटे, राहुल मिश्रा, सोनू दाते, अक्षय बाळसराफ, पुजा कोकाटे, शीतल ऐकोनकार, नेहा वैरागडे, वैशाली खेकारे, प्रतीक्षा गुजर, अनु वांदिले यांच्यासह मोठ्या संख्येने युवा परिवर्तन की आवाजचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.