शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
3
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
4
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
5
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
6
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
7
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
8
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
9
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
17
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
18
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
20
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

जि.प. सभापतिपद; भाजप नेत्यांमध्ये रस्सीखेच

By admin | Published: March 26, 2017 12:59 AM

जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर आता जनतेचे लक्ष लागले आहे ...

मोर्चेबांधणी : सदस्यांकडून भेटीगाठीराजेश भोजेकर वर्धाजिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर आता जनतेचे लक्ष लागले आहे ते सभापती पदांच्या निवडीकडे. जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा बहुमतात फडकला असला तरी आपल्याच प्रभावक्षेत्रातील सदस्याच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडावी, यासाठी भाजप नेत्यांमध्येच जोरदार रस्सीखेच सुरू आहे. येत्या १ एप्रिलला सभापती पदांची निवड होऊ घातली आहे. अर्थ व बांधकाम, महिला व बाल कल्याण, शिक्षण व आरोग्य तसेच कृषी व पशुसंवर्धन या पाच समित्यांच्या सभापतींची निवड होणार आहे. पैकी एक समिती उपाध्यक्षाकडे राहणार असल्यामुळे चार सभापतींचीच निवड होईल. जि. प. अध्यक्षपदावर सुरूवातीपासूनच हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचे आ. समीर कुणावार यांनी दावा सांगितला होता. सोबतच आर्वी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दादाराव केचे यांनीही दावा केला होता. यामध्ये आ. कुणावार यांचे पारडे जड पडल्याने त्यांच्या मर्जीतील सावली(वाघ) गटाचे सदस्य नितीन मडावी यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली, तर उपाध्यक्षपद आर्वी मतदार संघातील जळगाव गटाच्या सदस्य कांचन नांदुरकर यांच्या वाट्याला आले. उल्लेखनीय गटनेता पदही सरोज माटे यांच्या रूपाने हिंगणघाट विधानसभा क्षेत्रालाच मिळाले. यामुळे आता या मतदार संघाचा सभापतिपदावरील दावा संपला, असे भाजपात बोलले जात आहे. उपाध्यक्षाकडे एक समिती जाणार असल्यामुळे उर्वरित चार समित्यांसाठी भाजपश्रेष्ठींची कसोटी लागणार आहे.भाजपला बहुमत, तरीही कमालीची चुरसवर्धा : आर्वी विधानसभा क्षेत्रातील पारडी गटाचे सदस्य सुरेश खवशी यांच्या रुपाने पुन्हा एका सभापती पदाचा आग्रह दादाराव केचे पक्षश्रेष्ठींकडे धरुन असल्याची माहिती आहे. सभापती पदांबाबत देवळी आणि वर्धा विधानसभा मतदार संघाचेही दावे मजबूत आहे. वर्धा विधासभा मतदार संघातील येळाकेळी गटातील सदस्य सोनाली अशोक कलोडे यांचे नाव महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदासाठी तर नालवाडी गटाच्या सदस्य नुतन प्रमोद राऊत यांचे समाज कल्याण समिती सभापतीपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा आहे. अशोक कलोडे हे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे यांचे खंदे समर्थक आहे ही त्यांची जमेची बाजू आहे, तर प्रमोद राऊत हे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निकटवर्ती ओळखले जातात. हे दोन्ही सदस्य वेगवेगळ्या पदासाठी इच्छुक असल्यामुळे त्यांचे पारडे जड मानले जात आहे. विशेष म्हणजे, वर्धा मतदार संघाला दोन सभापतीपदे मिळावी, यासाठी आ. डॉ. पंकज भोयर फिल्डिंग लावून असल्याचे समजते. त्यांनी आपले पत्ते अद्याप उघडल्याचे ऐकिवात नाही. देवळी विधानसभा मतदार संघाची धुरा स्वत: खा. रामदास तडस वाहतात. या मतदार संघाचे राजकारण त्यांच्या नेतृत्वात होते. भिडी गटाचे सदस्य मुकेश भिसे, आंजी(मोठी) गटाच्या सदस्य जयश्री सुनील गफाट व गुंजखेडा गटाच्या सदस्य वैशाली जयंत येरावार यापैकी दोघांची सभापतिपदी वर्णी लागावी, यासाठी ते आग्रही असल्याची माहिती आहे. वर्धा जिल्हा परिषदेत भाजपला स्पष्ट बहुमत असले तरी सभापतिपदासाठी चारही विधानसभा मतदार संघातील भाजप नेते आपल्या प्रभावातील सदस्याला पद मिळावे, यासाठी हालचाली करीत आहे, यात कुणाला यश येते, या अनुषंगाने या निवडणुकीची चुरस चांगलीच वाढत आहे. यात कोण बाजी मारतो याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.