शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

खासगीकरणाच्या झगमगाटात जि.प.शाळेची झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 11:39 PM

खासगीकरणाच्या युगात जिल्हा परिषदेच्या शाळा दिवसेंदिवस ओस पडत चालल्या. याकडे शासनाचेही दुर्लक्ष असल्याने या शाळांमध्ये विद्यार्थी मिळणेही कठीण झाले आहे. परंतु अशा स्थितीतही आपल्या विशेष उपक्रमातून बोदड (मलकापूर) च्या जिल्हा परिषद शाळेने चांगलीच झळाळी घेतली आहे.

ठळक मुद्देबोदडची शाळा रोल मॉडेल : विशेष उपक्रमातून वेधले अनेकांची लक्ष, मान्यवरांच्या वाढल्या भेटीगाठी

देवकांत चिचाटे।लोकमत न्यूज नेटवर्कनाचणगाव : खासगीकरणाच्या युगात जिल्हा परिषदेच्या शाळा दिवसेंदिवस ओस पडत चालल्या. याकडे शासनाचेही दुर्लक्ष असल्याने या शाळांमध्ये विद्यार्थी मिळणेही कठीण झाले आहे. परंतु अशा स्थितीतही आपल्या विशेष उपक्रमातून बोदड (मलकापूर) च्या जिल्हा परिषद शाळेने चांगलीच झळाळी घेतली आहे. शिक्षकांच्या परिश्रमातून ही शाळा सध्या रोल मॉडेल ठरत असल्याने पदाधिकारी व मान्यवरांच्या भेटीगाठीही वाढल्या आहे.पुलगाव ते वर्धा मार्गावरील बोदड (मलकापूर) या गावातील जिल्हा परिषदेची शाळा ही या खासगीकरणाच्या झगमटाला अपवाद ठरत आहे. सध्या खासगी शाळांची इमारत, रंगरंगोटी यासह खेड्यातून शाळांपर्यंत विद्यार्थ्यांची ने-आण करण्याकरिता वाहनाची व्यवस्था, यामुळे ग्रामीण भागातील पालकही खासगी शाळांकडे आकर्षीत होत आहे.परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळातील लोंढे खासगी शाळांत जात आहे. पण, बोदडच्या शाळेतील शिक्षकांची कल्पकता, परिश्रम आणि जिज्ञासावृत्ती यामुळे या शाळेतील गळतीचे प्रमाण थांबविण्यात यश मिळाले आहे. शाळेच्या इमारतीसह वर्ग खोल्यांमध्ये अससेली आकर्षक रंग सजावट मन मोहून घेते. येथील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे म्हणून वेगळे संगणक कक्ष व स्वतंत्र प्रयोगशाळाही आहे. विद्यार्जनासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने भरीव कार्य करणाऱ्या या शाळेकडे अनेकांचे लक्ष वेधले जात आहे.या शाळेला जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले. तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सावरकर, पंचायत समिती सदस्य दिलीप अग्रवाल यांनीही भेट दिली. या शाळेतील ही भरारी पाहून बँक आॅफ इंडियाचे शाखा प्रबंधक दीपक पिंप्रीकर यांनी शाळा सजावटीकरिता साहित्य पुरविले. या शाळेतील बदल इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.कचऱ्यांतून साकारलीय कलाशिक्षणासोबतच जीवन जगण्याची कलाही शिकविली जाते.नेहमीच्या वापरातील दुचाकी व चारचाकी वाहनाने टायर खराब झाल्यानंतर ते फेकून दिल्या जाते किंवा जाळल्या जाते. परंतु या शाळेत ते टायर जमा करुन त्यांना आकर्षक रंग देण्यात आला. ते रंगविलेले टायर शाळेच्या बागेत लावले असून ते बागेचे संरक्षक झाले आहे.विद्यार्थ्यांनी फु लविली परसबागशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन शाळेतच परसबागही फुलविली आहे. या परसबागेत वनस्पती औषधीसोबतच भाजीपाल्याचीही लागवड केली आहे. त्यातून परीक्षेच्या अभ्यासासोबतच कृषीचीही माहिती दिल्या जाते.हाऊस ड्रेस संस्कृतीजिल्हा परिषदची शाळा म्हटले की, निळा पॅट व पांढरे शर्ट असा गणवेश असतो. हा गणवेश नित्याचाच असल्याने विद्यार्थीही कंटाळतात. त्यामुळे इंग्रजी शाळांप्रमाणे या शाळेतही हाऊस ड्रेस संस्कृतीचा अवलंब करण्यात आला आहे. दोन प्रकारचे गणवेश असून दोन दिवस एक आणि चार दिवस दुसरा असा गणवेश राहतात.त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेतील अनुभव येत आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळा