आॅनलाईन लोकमतवर्धा- स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनाचा व सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीचा कार्यक्र म मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी जि.प.च्या एका शिक्षकाने कार्यक्र मात येत क्षुल्लक कारणावरून अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत धिंगाणा घातला. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्र मादरम्यान एका शिक्षकाने तेथे येत सभागृहात अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या एका महापुरु षाचे छायाचित्र नाही आणि ते सभागृहात त्वरीत लावावे, अशी मागणी करीत उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे सुरू केले. यावेळी सदर शिक्षकाने पंचायत समितीच्या आवारात अंगावरील शर्ट काढून आपली मागणी रेटून धरली. सदर प्रकारामुळे पंचायत समिती कार्यालयात एकच खळबळ उडाली होती. गोंधळ घालणारा हा जि.प. चा शिक्षक असून नगराळे असे त्याचे नाव असल्याचे सांगण्यात आले.एका व्यक्तीने स्मृतिदिन व जयंतीपर कार्यक्र मात येऊन गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. घटनेच्यावेळी आपण पं.स. कार्यालयात नव्हते. हा व्यक्ती कोण होता याची आपणास माहिती नाही.महानंदा ताकसांडेसभापती, पं.स. वर्धा.
जि.प. शिक्षकाने फोटोवरून कार्यक्रमात घातला गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 2:46 PM
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनाचा व सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीचा कार्यक्रम मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी जि.प.च्या एका शिक्षकाने कार्यक्र मात येत क्षुल्लक कारणावरून अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत धिंगाणा घातला.
ठळक मुद्देअर्धनग्न अवस्थेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळमाजी पंतप्रधान इंदिरा गांधी स्मृतीदिनात गोंधळ