शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
2
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
3
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
4
न्यायाधीश अन् कोर्ट सगळंच खोटं; गुजरातमधील १०० एकर सरकारी जमीन बळकावली
5
सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...
6
मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन
7
Google कर्मचाऱ्यांना मोफत भोजन का पुरवते? सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं नेमकं कारण
8
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
9
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
10
यमुना एक्सप्रेस वेवरून जात होती कार, पोलिसांना आला संशय, तपाणसी केली असता सापडला सोन्याचा खजिना
11
प्रियंका चोप्राने अन्नू कपूर यांना किस करण्यास दिलेला नकार; म्हणाले, "माझ्याकडे चांगला चेहरा नाही..."
12
"देवेंद्र फडणवीसांनी फार हुशारीने..."; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप, मोदींनाही सवाल
13
"ही चूक हरयाणात झालीये, महाराष्ट्रातही होतेय", पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवलं मुद्द्यावर बोट
14
"दिल्लीत गुन्हेगारी वाढतेय, लोकांच्या मनात भीती असते की..."; आप नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"बंटेंगे तो कटेंगे", मुंबईत योगींचे फोटो असलेले बॅनर्स; काय म्हणाले मुख्तार अब्बास नकवी?
16
चीनच्या जीडीपी एवढे झाले गोल्डचे मार्केट कॅप, 5 वर्षात व्हॅल्यू डबल; चेक करा देशातील सोन्या-चांदीचा लेटेस्ट दर
17
डॅशिंग IAS अधिकारी! वयाच्या ५७व्या वर्षी प्रेमविवाह; आता मंदिरांवरील लाऊडस्पीकरवर 'सवाल'
18
धर्मासाठी सिनेइंडस्ट्रीला केला रामराम, ३ हिट सिनेमात केलं होतं काम, सध्या काय करतेय २४ वर्षीय अभिनेत्री?
19
भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले
20
अजित पवार गट विधानसभेच्या किती जागा लढवणार? अजितदादा म्हणाले... 

जि.प. शाळांबाबत जगातील दुसरा तंबाखूमुक्त जिल्हा

By admin | Published: May 03, 2017 12:44 AM

जिल्हा परिषदेतील ध्वजारोहण समारंभात जि.प. अध्यक्ष नितीन मडावी व मुख्य कार्यकारी अधिकार नयना गुंडे यांनी

महाराष्ट्रदिन समारंभात घोषणा : जि.प. च्या सर्व ९२७ शाळा व्यसनापासून दूर वर्धा : जिल्हा परिषदेतील ध्वजारोहण समारंभात जि.प. अध्यक्ष नितीन मडावी व मुख्य कार्यकारी अधिकार नयना गुंडे यांनी वर्धा जिल्हा हा जगातील दुसरा तंबाखूमुक्त जि.प. प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांचा जिल्हा म्हणून घोषित केला. जिल्ह्यातील नवी पिढी व्यसनमुक्त राहावी, त्यांच्यात व्यसनविरोधी मानसिकता तयार व्हावी, यासाठी जिल्हा परिषद, सलाम मुंबई फाऊंडेशन व बजाज इलेक्ट्रीकल्स लिमिटेड यांनी आॅगस्ट २०१५ पासून तंबाखूमुक्त शाळा अभियान जिल्ह्यात ९२७ जि.प. शाळांमध्ये राबविले. शिक्षक, मुख्याध्यापकांनी हिरिरीने उपक्रमात भाग घेतला. या शाळांनी जागतिक आरोग्य संघटनेचे तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्थेचे ११ निकष पूर्ण केले आहेत. अभियानांतर्गत अनेक शिक्षक, पालकांनी तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन सोडले आहे. व्यसनमुक्त झालेल्या सर्व शिक्षक, पालकांचा सत्कार ‘वर्धा श्री’ प्रमाणपत्र देऊन केला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे व्यसन सोडविले, त्या विद्यार्थ्यांनाही ‘वर्धाभूषण’ हे प्रमाणपत्र दिले जाईल. सर्व तंबाखूमुक्त शाळांचा व अधिकारी वर्गाचा जुलै महिन्यात सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, शिक्षणाधिकारी किसन शेंडे, उपशिक्षणाधिकारी डॉ. वाल्मिक इंगोले, सर्व पं.स. गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांचे हा उपक्रम तळमळीने राबविल्याबद्दल अभिनंदन केले. यानंतर माध्यमिक शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये व आरोग्य संस्था तंबाखूमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला. ग्रामसभांमध्येही ग्रामसेवक व शिक्षकांनी तंबाखूमुक्त जीवनाची आणि भविष्यात गावातील शाळा तंबाखूमुक्त राखण्याची शपथ ग्रामस्थांना दिली. जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी प्राथमिक शिक्षण विभागास शुभेच्छा देत १५ आॅगस्टपासून गावेही टप्प्या-टप्प्याने तंबाखूमुक्त करण्याचा संकल्प केला. समारोपप्रसंगी नयना गुंडे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्त राहण्याची आणि आपली कार्यालये तंबाखूमुक्त बनविण्याची शपथ दिली.(कार्यालय प्रतिनिधी)