लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विमा पॉलिसीच्या नावाखाली खोटी बतावणी करून नागरिकांची ठगबाजी करणाऱ्या तिघांना वर्धा सायबर ठाण्याच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी रोखेसह कॉल सेंटरमधील साहित्य असा एकूण दोन लाख २२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिल्ली येथे आठ दिवस ठाण मांडून वर्धा पोलिसांनी ही कारवाई केली हे विशेष.वायगाव (नि.) येथील महेश बळीराम कुंभारे या व्यावसायिकाला याच ठगबाजांनी फोन करून अत्यअल्प मोबदल्यात विमा पॉलिसीचा लाभ मिळून देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्यावर विश्वास ठेवून महेश कुंभारे यांनी आरोपीने दिलेल्या बँक खात्यात तब्बल ३० लाखांची रक्कम भरली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी देवळी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पुलगावच्या ठाणेदारांकडे वळता झाला.दरम्यान सायबर सेलच्या पोलिसांसह पुलगाव पोलिसांकडून समांतर तपास सुरू असताना ठगबाजी करणारे दिल्ली येथील असल्याचे पुढे आले. त्यानंतर पोलिसाच्या चमूने दिल्ली गाठून प्रभासकुमार श्रीनारायणदासकुमार (२३) रा. पोलीस कॉलनी नवी दिल्ली, मोहनकुमार नरेंद्रकुमार शुक्ला (३३) रा. नथ्थुपुरा नवी दिल्ली व भानुप्रताप ठाकूर रा. दिल्ली यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. पुढील कार्यवाहीसाठी आरोपींना पुलगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक मिलिंद रामटेके, पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक आशीष मोरखेडे, गजानन लामसे, दिनेश बोथकर, अनुप कावळे, अविनाश बंन्सोड, नीतेश मेश्राम, रामकिशन इप्पर, गोपाल बावणकर, मनीष कांबळे, नीलेश कट्टोजवार, अक्षय राऊत, अभिजित वाघमारे, आत्माराम भोयर यांनी केली.बँकेने दिलेली माहिती तपासात ठरली फायद्याचीया प्रकरणाचा छडा लावताना पोलिसांना बँकेकडून काही खात्रीदायक माहिती प्राप्त झाली. त्यानंतर पोलिसांनी दिल्ली गाठून या तिनही ठगबाजांना ताब्यात घेतले. प्रभासकुमार श्रीनारायणदासकुमार व मोहनकुमार शुक्ला यांना सुरुवातीला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून दोन मोबाईल दोन वेगवेगळ्या बँकेचे एटीएम व रोख ४ हजार ५०० रुपये जप्त केले. त्यानंतर आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात मोबाईल, दुरध्वनी संच, लॅपटॉप, राऊटर, बुस्टर, मोबाईल चार्जर आणि आवश्यक कागदपत्रे असा एकूण ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.तीन कोटींवर उलाढालसदर प्रकरणातील आरोपींकडून पोलिसांनी ९० हजारांची रोख रक्कम जप्त केली आहे. विशेष म्हणजे, या आरोपींनी संगणमत करून काही व्यक्तींचे बँक खाते भाडेत्त्वावर घेतले होते. शिवाय त्यात बँक खात्यातून आतापर्यंत या ठगबाजांनी सुमारे ३ कोटींवर रक्कमेची उलाढाल केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.कॉल सेंटरवर ठेवले होते पाच पगारी कर्मचारीठगबाजांच्या या टोळीतील मुख्य असलेल्या भानुप्रताप ठाकूर याने दिल्ली येथील कॉल सेंटरवर दोन महिलांसह तीन पुरुष असे पाच जणांना पगारी कर्मचारी म्हणून नियुक्त केले होते, असे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.दीड वर्षापासून सुरू होते गौडबंगालसुमारे दीड वर्षापूर्वी वायगाव (नि.)च्या महेश कुंभारे याला आरोपींनी आपल्या जाळ्यात अडकविले. त्यानंतर आरोपींनी वेळोवेळी विविध कारणे पुढे करून महेश कुंभारे याला एकूण तब्बल २९ लाख ८७ लाख ८८८ रुपयांनी गंडा घातला, हे विशेष.
विमा पॉलिसीच्या नावावर गंडा घालणारे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 9:38 PM
विमा पॉलिसीच्या नावाखाली खोटी बतावणी करून नागरिकांची ठगबाजी करणाऱ्या तिघांना वर्धा सायबर ठाण्याच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी रोखेसह कॉल सेंटरमधील साहित्य असा एकूण दोन लाख २२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ठळक मुद्देरोखेसह बोगस कॉल सेंटरमधील साहित्य जप्त