आॅनलाईन लोकमतवर्धा : सुशिक्षित बेरोजगार संस्थांना जिल्हा परिषद अंतर्गत काम देण्यात यावे, अशी मागणी लोकशाही दिनात तक्रार करून वर्धा जिल्हा बेरोजगार सेवा सहकारी संघाने केली आहे.या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. सर्व शासकीय कार्यालयात वारंवार मागणी करूनही बेरोजगार सेवा संस्थेला काम देण्यात टाळाटाळ होत आहे. राज्यपालानी याबाबतचे आदेश जाहीर केले असताना या आदेशाची अवहेलना होत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रत्येक भागाची एक यादी करून तीन लाख रुपयांवरील कामाची ई-निविदा काढून एकाच संस्थेला लाखो रूपयाचे काम दिले. त्यामुळे अन्य संस्थावर अन्याय झाला. ग्रामीण भागातील १० गावांच्या खेड्यासाठी उपकेंद्र असताना उपकेंद्रामध्ये तीन लाखाच्या आतील वेगळे कामे करावयाचे होते. मात्र ई-निविदा काढून जीएसटीचा खर्च वाढविला. दहा दिवसात याबाबत निर्णय न झाल्यास २५ जानेवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा जिल्हा फेडरेशनचे सचिव वसंत ढोबे, विशाल हजारे, महेंद्र यादव, चेतन चोरे, शाला गिरी, माधुरी मगर यांनी दिला.
बेरोजगार सेवा संस्थांना जि.प. अंतर्गत कामे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 12:03 AM
सुशिक्षित बेरोजगार संस्थांना जिल्हा परिषद अंतर्गत काम देण्यात यावे, अशी मागणी लोकशाही दिनात तक्रार करून वर्धा जिल्हा बेरोजगार सेवा सहकारी संघाने केली आहे.
ठळक मुद्देलोकशाही दिनात तक्रार : राज्यपालाच्या आदेशाची अवहेलना