शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बॅसिनच्या चेअरमनसह १२ जणांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 1:28 AM

तत्कालीन नगरपरिषदेच्या आरक्षित जागेवर बोगस कागदपत्रांच्या आधारे प्लॉट पाडून त्याची विक्री केल्याप्रकरणी वसईतील दोन विकासकांसह प्लॉट खरेदी करून बंगले बांधणाऱ्या ११ जणांवर वसई पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वसई : तत्कालीन नगरपरिषदेच्या आरक्षित जागेवर बोगस कागदपत्रांच्या आधारे प्लॉट पाडून त्याची विक्री केल्याप्रकरणी वसईतील दोन विकासकांसह प्लॉट खरेदी करून बंगले बांधणाऱ्या ११ जणांवर वसई पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन विकासकांपैकी एक बॅसिन कॅथोलिक बॅकेचे चेअरमन ओनिल आल्मेडा असल्यामुळे वसईत खळबळ उडाली आहे.मे.वेलकास्ट कंट्रक्शन कंपनीचे भागीदार तथा वसईतील अग्रगण्य बॅकेचे विद्यमान चेअरमन ओनिल आल्मेडा व त्यांचा साथीदार विकासक मिल्टन परेरा यांनी तत्कालीन नगरपरपरिषदेच्या राखीव भूखंडावर २० फेब्रुवारी १९९८ मध्ये बनावट कागदपत्राच्या आधारे सिडकोकडून बांधकाम परवानगी घेतली होती. ही जागा २७ जुलै १९९८ ला असोसिएट प्लॅनर सिडकोकडून रिलोकेट केली गेली.सदर जागेचे एफ. एस. आय . मे.वेलकास्ट कंट्रक्शन कंपनीने वापर करून इमारतीचे बांधकाम करून विक्र ी केली होती. मात्र, आता २० वर्षानंतर सदर जागा ही तत्कालीन नगर परिषदेसाठी मैदान व उद्यानासाठी राखीव असल्याचे लक्षात आल्यावर १३ जुलै २०१८ रोजी प्रभाग समिती आयचे तत्कालीन सहा आयुक्त रतेश किणी यांनी सदर दोन विकासक व जागा खरेदी करणारे इतर भागीदारांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी वसई पोलिस ठाण्यात तक्र ार दाखल केली होती. त्यानुसार नगर रचना विभागाकडून तत्कालीन नगरपरिषदेच्या ८ ,डिसेंबर १९९५ च्या कागदपत्रांची छाननी केली असता, सदर भूखंड आरक्षित असताना बनावट कागदपत्रे बनवून तत्कालीन नगरपरिषदेची फसवणूक केल्याचे लक्षात आले. तसेच, २८ फेब्रुवारी २००० च्या जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्याकडून देण्यात आलेल्या बिनशेती परवानगी कागदपत्रे तपासले असता ४३५०.२७ चौरस मीटर क्षेत्र हे मैदान व उद्यानासाठी आरिक्षत असल्याचे समोर आले होते.याबाबत आता प्रभाग समिती आयचे विद्यमान सहा. आयुक्त मनोज वनमाळी यांनी वसई पोलिस ठाण्यात सबंधीत दोन विकासक व इतर ११ भागीदारांवर तक्र ारीच्या अनुषंगाने गुन्हे दाखल केले आहेत.याबाबत फसवणूक व एमआरटीपीए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक ए.एम.मुल्ला करित असल्याची माहिती माणिकपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक दामोदर बांदेकर यांनी सांगितले. तर आल्मेडा यांनी या प्रकरणी आम्ही कुणाचीही फसवणूक केली नसल्यचा निर्वाळा दिला आहे.>कोण आहेत आरोपी...ओनिल आल्मेडा, मिल्टन परेरा, संजय डिकोना, शुभांगी पाटील, श्रद्धा पाटील, किशोरी गवसकर, अजय डिकोना, विल्यम डिसिल्वा, मनिष घोन्सालवीस, निलेश घोन्सालवीस, आॅसडेन परेरा, जोसेफ रोजारिवो व रूकसाना तुलसीधरण असे मुख्य आरोपी असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.>संबंधितांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत तपास करून दोषी आढळल्यास कारवाई करून अटक करणार आहोत.- दामोदर बांदेकर,वरिष्ठ पोलिस निरीक्षक माणिकपूर पोलिस ठाणे