शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
2
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
3
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
4
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
5
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
6
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
7
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
8
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
9
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
10
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
11
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
12
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
13
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
14
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
15
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
16
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात २५ पैकी १२ पदे रिक्त !

By admin | Published: January 11, 2017 5:58 AM

या तालुक्यातील गाव-खेडया-पाडयांत सध्या थंडी व वातारणातील बदलामुळे अनेक आजार बळावत असून दैनंदिन ३०० ते ३५० बाहय रुग्णांचा वाढता भार या

राहुल वाडेकर / विक्रमगडया तालुक्यातील गाव-खेडया-पाडयांत सध्या थंडी व वातारणातील बदलामुळे अनेक आजार बळावत असून दैनंदिन ३०० ते ३५० बाहय रुग्णांचा वाढता भार या ग्रामीण रुग्णालयावर पडत असून त्यामध्ये ताप-मलेरिया, टायफाईड, सर्पदंशाचे रुग्ण व गरोदर महिलांचा समावेश असतो. मात्र त्यान्ाां उपचार देणारे उपलब्ध कर्मचारी, यंत्रणा खूपच अपुरी असल्याने सध्या हे रुग्णालय सलाईनवर आहे. पूर्ण तालुक्याकरीता फक्त एकच वैद्यकिय अधिकारी(डॉक्टर) आपल्या अपु-या कर्मचा-यांना घेऊन तारेवरची करसतर करीत आहे. सद्यस्थितीत या रुग्णालयात वैद्यकिय अधिक्षकासह, वैद्यकिय अधिकारी, सहा. अधिक्षक, क.लिपीक, क्ष-किरण तंत्रज्ञ, प्रयोग शाळा सहा., कक्षसेवक, सफाईगार अशा मंजूर २५ पदांपैकी १२ पदे रिक्त आहेत. एकाच वैद्यकीय अधिका-यावर सा-या तालुक्याचा भार पडत असल्याने येथे डॉक्टरांबरोबरच, तज्ज्ञ डॉक्टरांची कमरतता वारंवार भासत आहे. तसे पाहीले तर या रुग्णालयात शासनाने आॅपरेशनकरीता लागणारी महागडी आवश्यक ती यंत्रसामुग्री दिलेली आहे. परंतु ती चालविण्यास अगर त्याचा वापर करण्यास तज्ज्ञ डॉक्टर अगर त्या विभागातील कर्मचारी नसल्याने त्याचा फायदा रुग्णांना होतांना दिसत नाही. तर यंत्रसामुग्रीकरीता असलेले तपासणी किट वेळेवर दिले जात नसल्याने उपलब्ध किटमधील औषध संपल्यावर अडचण निर्माण होत असतात. तसेच या रुग्णालयातील ही परिस्थती तालुका निर्मितीपासूनची असून तात्पुरत्या स्वरुपात येथे वैदयकिय अधिकारी म्हणून डॉ.मिलिंंद खांडवी यांना देण्यात आलेले होते. त्यांचाही तात्पुरतीचा कार्यकाळ संपल्याने त्यांना आता कासा रुग्णालयात नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र विक्रमगडच्या ग्रामीण रुग्णालयावर अतिरिक्त रुग्णांचा वाढता भार पाहता डॉ.मिलिंंद खांडवी यांना इतरत्र नियुक्ती देण्याएैवजी विक्रमगड येथेच कायम करावे अशी मागणी होत आहे.इमारत छान सुविधांची मात्र सारीच बोंबच्१९९९ मध्ये लोकसंख्येच्या आधारे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. यापूर्वी हे रुग्णालय गेली नऊ ते दहा वर्षे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत चालविले जात होते व नंतर चार वर्षापूर्वी ते नवीन सुसज्ज इमारतीत हलविलण्यांत आले. मात्र त्यावेळेस फक्त प्रमुख इमारतच सुसज्ज होती बाकी सर्व काम अर्धवटच होती तर अनेक पदेही रिक्तच होती. त्यामुळे जरी इमारत चांगली असली तरी येथे पाहीजे ते उपचार होत नव्हतेच आजही येथे प्राथमिकच उपचार केले जात असल्याचा आरोप येथील नागरिक व रुग्ण करीत आहेत. त्याला येथील डॉक्टर व कर्मचारीही खाजगीत दुजोरा देत आहेत.च्हा जंगली व आदिवासी भाग असल्याने साथीचे आजार नेहमीच बळावतात. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर व पूर्ण कर्मचारी असणे आवश्यक आहे. कारण तालुक्यातील ९४ गावपाडे व दिड लाख लोकसंख्येकरीता हेच मोठे व योग्य औषधोपचार मिळाणारे एकच रुग्णालय आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.च्ग्रामीण खेडयापाडयातील व शहरातील घाणीचे साम्रज्य, खड्ड्यातील गढूळ पाणी व मातीमिश्रीत पाण्याचे सेवन, उघडयावरील दूषित पदार्थ खाणे यामुळे आजार बळावत आहेत. तालुक्यात जंगल असल्याने तसेच खेडयातील लोक रा़त्रं-दिवस शेतात काम करीत असल्याने संर्पदंशचे रुग्ण हमखास दाखल होत आहेत, च्तर घाणीचे साम्राज्य, उघड्यावर होणारे मलमूत्र विसर्जन जागोजागी तयार होणारी गटारींची डबकी, अस्वच्छता, तुंबलेली गटारे, तुंबलेले सांडपाणी त्यापासून होणारी डासांची मोठी उत्पत्ती या कारणाने मलेरिया, टायफाईड, डायरिया, गॅस्ट्रो हे साथीचे आजार देखील मोठ्या प्रमाणात बळवतात व त्याचे रुग्ण या ग्रामीण रुग्णालयात दाखल होत आहेत. विक्रमगड रुग्णालयाचे प्रमुखपद रिक्त असल्याने कुणाही कर्मचा-यावर कुणाचा अंकुश नाही. त्यामुळे येथे सर्वच सावळा गोेंधळ चालू आहे. जो तो कर्मचारी आपली मनमानी करीत आहे. कुणीही औषधे देतात, कुणीही केसपेपर काढतो, कुणीही नाईट शिफ्ट घेतो, असे चित्र आहे. वरिष्ठांनी या रुग्णालयाची चौकशी करुन यावर अंकुश ठेवावा अशी मागणी आहे.